BBM3 : सोनाली-विकासचं भांडण, बिग बॉसच्या घरात राडा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

sonali patil and vikas patil
BBM3 : सोनाली-विकासचं भांडण, बिग बॉसच्या घरात राडा

BBM3 : सोनाली-विकासचं भांडण, बिग बॉसच्या घरात राडा

सध्या छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कार्यक्रम म्हणजेच बिग बॉस मराठी. या कार्यक्रामाचे तिसरे पर्व चांगलच रंगले असून घरात नवनवीन टास्क होत असतात. घरातील स्पर्धकांचा वावर आणि धमाल मस्ती प्रेक्षकांना आवडते. घरात होणाऱ्या प्रत्येक टास्कनंतर चाहते त्यावर प्रतिक्रिया देत असतात. नुकतंच घरात नॉमिनेशन एक्स्प्रेस हे कार्य पार पडलं.त्यानंतर आता मासळी बाजार हा नवा टास्क रंगणार आहे. मात्र, नेहमीप्रमाणे या टास्कमध्ये देखील घरात राडा होणार आहेत.

बिग बॉसच्या घरात आज मासळी बाजार हा नवा टास्क रंगणार आहे. या टास्कमध्ये घरातील काही सदस्य माशांची विक्री करणार आहेत. मात्र, या सदस्यांनी माशांचे जे भाव लावले आहेत. त्यावरुन सोनाली आणि विकासमध्ये वाद होणार आहे. टास्कमध्ये विकास माशांची विक्री करत आहे. यावेळी सोनाली त्याच्या दुकानात मासे खरेदी करायला जाते. त्यावर एका टोपलीची किंमत ८ हजार रुपये असल्याचं विकास सांगतो. तेव्हा ८ हजाराचे कधी मासे असतात का त्यापेक्षा ३ हजारात सगळे मासे द्या असं सोनाली सांगते. पण, ८ वरुन डायरेक्ट ३ हजार इतका कमी भाव परवडत नाही असं विकास म्हणतो.

हेही वाचा: BBM 3: प्रेक्षकांची लाडकी सोनाली आहे प्रशिक्षित नेमबाज

माशांच्या किंमतीवरुन दोघांमध्ये वाद होतो. हे नुसते कागद नाही याला किंमत आहे. काय डायरेक्ट जेट्टीवरून माल उचलला आहे का ? अशी शाब्दिक चकमक दोघांमध्ये होते. अखेर हा मासा नेमका कितीला विकला जातो ते आजच्या मासळी बाजार या टास्कमध्येच प्रेक्षकांना कळणार आहे. आता पुढे टास्कमध्ये काय होणार हे पाहण्यासाठी बघत राहा, बिग बॉस मराठी सीझन ३ सोमवार ते रविवार रात्री ९.३० वाजता कलर्स मराठी वाहिनीवर पाहायला मिळेल.

loading image
go to top