Big Boss Marathi 3 : ''नुसतं भांडलं, जोरात ओरडलं म्हणजे मत मांडल असं नसतं; शिवलीलाचा तृप्ती देसाईंना टोला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नुसतं भांडलं, ओरडलं म्हणजे मत मांडल असं नसतं; शिवलीलाचे तृप्ती देसाईंना टोला

नुसतं भांडलं, ओरडलं म्हणजे मत मांडल असं नसतं; शिवलीलाचे तृप्ती देसाईंना टोला

मुंबई : बिग बॉस मराठी 3 ची धमाकेदार सुरवात झाली असून प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नुकतीचं बिग बॉसच्या घरात चावडी भरविण्यात आली होती. या चावडीचे सुत्रसंचलन अभिनेते, दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी केले. दरम्यान घरात बिगबॉसकडून सदस्यांना नवे टास्क दिले आहे ज्यामध्ये ते एकेमेकांची पोलखोल करणार आहेत. या टास्क दरम्यान, तृप्ती देसाई यांनी शिवलीला पाटीलवर निशाना साधला आहे, आता शिवलीला त्यावर काय प्रत्यूत्तर देणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक आतूर झाले आहे.

हेही वाचा: Video: 'मी राज कुंद्रासारखी दिसते का?'; पत्रकारांना शिल्पा शेट्टीचा प्रतिप्रश्न

बिगबॉसच्या चावडीवर मांजरेकर यांनी मीरा, उत्कर्ष आणि गायत्री यांचा चांगलंच फैलावर घेतले तर दादूस यांच्या उत्तम खेळाचं तोंडभरून कौतूकही केले. अविष्कार या आठवड्यात वाईट सेवक ठरला तर स्नेहा वाघ सर्वोत्कृष्ठ मालकीण ठरली. याशिवाय चावडीवर नवे खेळ रंगणार आहे ज्यामध्ये घरातील सदस्य एकमेकांबाबत खटकणाऱ्या गोष्टी बोलून दाखवणार आहे. या टास्कमध्ये मीनल जयच्या वाईट गोष्टी सांगणार आहे तर तृप्ती शिवालीला तिच्या खेळाबाबत वाईट गोष्टी सांगणार आहे. शिवलीलाला तिच्या खेळाबाबत सल्ला देताना तृप्त म्हणाल्या की, ''शिवलीला तुला तुझ्या बुद्धीचा वापर करता येत नाही का? तुला दुसरे कोणी काही सांगेल तू मान्य करतेस? ''

हेही वाचा: Video : २६ वर्षांनंतर मिलिंद सोमणचा रॅम्प वॉक; अनुभवी मॉडेल्सही पडतील फिके

शिवलीला तृप्तीच्या या टिकेला तिच्या शैलीत उत्तर देणार आहे. शिवलीला तृप्तीला उत्तर देते की, मला जिथे बोलण्याची गरज वाटते तिथेच मी बोलते. सर्वांचा मान राखून बोलते. माझ्या कुटुंबानी दिलेल्या संस्कारानुसार, विनाकारण दुसऱ्या कोणाच्या विचारांमध्ये स्वत:चे विचार घूसवणे चूकीचे वाटते. मला माझे विचार ज्यांच्यापर्यंत पोहचवायचे आहे ते मी पोहचवते. मी घरात कोणासोबत बोलत नाही असे अजिबात वाटत नाही. फक्त भांडण केलं किंवा जोरात ओरडून बोलले म्हणजे आपलं मत मांडले असे होत नाही.मी महिला असले तरी माझी मतं वेगळी आहेत आणि मी त्यावर ठाम आहे''

Web Title: Bigg Boss Marathi 3 During Task Shivleela Patil Answer To Trupti Desai Allegations

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..