आता चर्चा तर होणारच! बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर सोनालीने घेतली 'या' व्यक्तीची भेट | Sonali Patil | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sonali Patil

आता चर्चा तर होणारच! बिग बॉसच्या घराबाहेर पडल्यानंतर सोनालीने घेतली 'या' व्यक्तीची भेट

बिग बॉस मराठीचा तिसरा सिझन (Bigg Boss Marathi 3) अंतिम टप्प्यात असताना सोनाली पाटीलला (Sonali Patil) घराबाहेर जावं लागलं. सोनालीच्या एलिमिनेशननंतर सोशल मीडियावर बिग बॉस मराठीवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. सोनाली टॉप ५ स्पर्धकांमध्ये असेल, असं अनेकांना वाटलं होतं. त्यामुळे तिच्या एलिमिनेशनचा धक्का चाहत्यांसोबत सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांनाही बसला. सोनालीने घराबाहेर पडल्यानंतर एका खास व्यक्तीची भेट घेतली आहे. त्या खास व्यक्तीने सोशल मीडियावर सोनालीसोबतचा फोटो पोस्ट केला आहे.

ही खास व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेता अक्षय वाघमारे आहे. अक्षयने सोनालीची भेट घेतली असून या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. 'आता चर्चा तर होणारच, बिग बॉसच्या घराबाहेर आमची पहिली भेट', असं कॅप्शन देत अक्षयने हा फोटो पोस्ट केला आहे.

हेही वाचा: 'प्रेक्षकांच्या मतांची किंमत नाही'; सोनालीला चाहत्यांकडून मोठा पाठिंबा

सोनालीने बिग बॉस मराठीच्या घरात सुरुवातीपासूनच आपली वेगळी छाप सोडली होती. सोशल मीडियावर तिची नेहमी चर्चा असायची. कोल्हापुरी लहेजा आणि अफलातून नृत्य कौशल्य यांनी तिने चाहत्यांची मनं जिंकली होती. विशाल निकम आणि विकास पाटील यांच्यासोबतची तिची मैत्री आणि वाद नेहमीच प्रेक्षकांचं मनोरंजन करायचे.

जवळपास ९० हून अधिक दिवस सोनाली बिग बॉसच्या घरात होती आणि ग्रँड फिनालेमध्ये पोहोचणाऱ्या स्पर्धकांमध्ये तिचं नाव आवर्जून असेल असं अनेकांना वाटलं होतं. सोनालीच्या एलिमिनेशनमुळे सूत्रसंचालक महेश मांजरेकर यांना सुद्धा धक्का बसला. या सीझनमधील हे सर्वात धक्कादायक एलिमिनेशन असल्याचं मत मांजरेकर यांनी मांडलं.

Web Title: Bigg Boss Marathi 3 Evicted Contestant Sonali Patil Meets This Special Person

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..