esakal | BBM 3: "अंथरुणाला खिळून आहे माझा ८ वर्षांचा मुलगा"; विकास पाटील भावूक
sakal

बोलून बातमी शोधा

vikas patil

"सोसायटीतील इतर मुलांसोबत खेळत असताना माझा मुलगा मौर्य अचानक पाण्याच्या टँकमध्ये पडला. तेव्हा तो तीन वर्षांचा होता."

"अंथरुणाला खिळून आहे माझा ८ वर्षांचा मुलगा"; विकास पाटील भावूक

sakal_logo
By
स्वाती वेमूल

Bigg Boss Marathi 3: 'बिग बॉस मराठी ३'च्या घरातील इतर स्पर्धकांसोबत गप्पा मारत असताना विकास पाटील Vikas Patil त्याच्या आठ वर्षांच्या मुलाच्या आठवणीत भावूक झाला. विशाल निकम, सोनाली पाटील, मीनल शाह यांच्याशी तो बोलत होता. "सोसायटीतील इतर मुलांसोबत खेळत असताना माझा मुलगा मौर्य अचानक पाण्याच्या टँकमध्ये पडला. तेव्हा तो तीन वर्षांचा होता. टँकमधून बाहेर काढण्यासाठी जवळपास सात ते आठ मिनिटं लागली. तेवढा वेळ पाण्यात राहिल्याने त्याच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम झाला. आता तो आठ वर्षांचा असून अंथरुणालाच खिळलेला आहे. त्याच्या आरोग्यावरील उपचार सुरू आहेत, परंतु त्याला ठीक व्हायला अजून काही काळ लागेल", असं विकासने सांगितलं.

यावेळी विकासने त्याच्या पत्नीचे आभार मानले. "माझी पत्नी मुलाची खूप काळजी घेते. तिच्या मदतीशिवाय काहीच शक्य झालं नसतं", असं तो म्हणतो. विकासच्या मुलाची परिस्थिती ऐकून घरातील सदस्यांच्या डोळ्यात पाणी तरळले. विकास पहिल्यांदाच त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बिग बॉसच्या घरात व्यक्त झाला.

हेही वाचा: BBM 3: जय दुधाणे नेटकऱ्यांच्या निशाण्यावर

पुढील भागात काय घडणार?

बिग बॉस मराठीच्या पुढील भागात प्रेक्षकांना डान्स पे चान्स हे कॅप्टन्सी कार्य पहायला मिळणार आहे. सदस्यांनी या कार्यासाठी एकापेक्षा एक आकर्षक असे गेटअप केले आहेत. सुरेखा कुडची-अक्षय वाघमारे, संतोष चौधरी (दादुस) – आविष्कार दारव्हेकर, मीनल शाह – गायत्री दातार, उत्कर्ष शिंदे - सोनाली पाटील, मीरा जगन्नाथ – तृप्ती देसाई आणि स्नेहा वाघ – विकास पाटील या जोड्या असणार आहेत. दादुस आणि आविष्कार यांनी पार्टनर चित्रपटातल्या गाण्यावर धमाल डान्स केला.

loading image
go to top