Bigg Boss marathi 4: हारकर जितने वाले को.. टीमकडून अमृता देशमुखचं कौतुक, कारण.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss marathi 4 Appreciation of Amrita Deshmukh from the team for see saw task

Bigg Boss marathi 4: हारकर जितने वाले को.. टीमकडून अमृता देशमुखचं कौतुक, कारण..

bigg boss marathi 4: बिग बॉस मराठीच्या घरातला प्रवास जसजसा पुढे जात आहे, तसं तसे अवघड आणि अत्यंत कठीण टास्क पुढे येत आहेत. नुकताच बिग बॉस यांनी "खुल्ला करायचा राडा" हे कार्य सदस्यांवर सोपवले होते. या कार्यात अक्षरशः घरात मोठा राडा पाहायला मिळाला. सदस्यांनी हा टास्क जिंकण्यासाठी वाटेल ते केले. अगदी मिरचीची धुरी, कचरा, तेल अशा नाना गोष्टींचा वापर करून सदस्यांनी हा टास्क पूर्ण केला. या टास्कमध्ये अमृता देशमुखची टीम हरली म्हणजेच अमृता देशमुख, अपूर्वा नेमळेकर, अक्षय केळकर, स्नेहलता यांची टीम हरली. पण या टास्क मध्ये अमृता देशमुख ज्या पद्धतीने खेळली त्याने सर्वांचीच मनं जिंकली.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: अमृता धोंगडे आणि अक्षय केळकर यांच्यात मोठा राडा..

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये "खुल्ला करायचा राडा" हे कार्य संपल्यावर अक्षय, अमृता देशमुख, स्नेहलता आणि अपूर्वा या चोघांमध्ये कार्याविषयी चर्चा रंगणार आहे. तिघांच्या मते अमृता देशमुखने सगळ्यात छान परफॉर्म केले. यांच्यात सविस्तर नक्की काय चर्चा झाली ते आजच्या भागामध्ये कळेलच, पण काही मुद्दे आपल्यासमोर आले आहेत.

स्नेहलता अक्षयला विचारताना दिसणार आहे, तू खुश आहे का परफॉर्मन्सने ? अक्षयचे म्हणणे पडले, हो मी खुश आहे फक्त हरल्याचे दुःख आहे, माझ्यामुळे रोहित आऊट झाला नाहीतर तो कमाल खेळला होता. स्नेहलता अमृताला सांगताना दिसणार आहे, तू पण कमाल खेळलीस. एक गोष्ट लक्षात ठेव इथे असलेल्या बाकीच्या मुलींपेक्षा, जे खेळले ना तू सगळ्यात छान खेळलीस... अक्षयचे देखील म्हणणे पडले तू बेस्ट खेळलीस. अमृता धोंगडे नाही खेळली आणि तेजस्विनी तर तो राऊंड फेल गेला म्हणून... यशश्री पण उडाली... अक्षयचे म्हणणे आहे त्यांच्या टीममध्ये प्रत्येकजण कमाल खेळले.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi