Akshay Kelkar - Amruta Deshmukh: लिहिताना खूप त्रास होतोय पण.. अमृताने लिहिलं अक्षयला पत्र | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kelkar, amruta deshmukh, amruta deshmukh wrote letter to akshay

Akshay Kelkar - Amruta Deshmukh: लिहिताना खूप त्रास होतोय पण.. अमृताने लिहिलं अक्षयला पत्र

बिग बॉस मराठी ४ शो संपला असला तरीही शो मधील स्पर्धकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. शो मध्ये अमृता देशमुख आणि अक्षय केळकरची यांची विशेष मैत्री चर्चेत राहिली. बिग बॉसच्या घरात दोघांमध्ये अनेक भांडणं झाली. परंतु शो संपल्यावर दोघांनी एकमेकांची भेट घेतली. अक्षय नुकताच अमृताला भेटायला गेलेला. अक्षयने त्याचा एक vlog व्हिडीओ बनवून तो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. यावेळी भेट झाल्यावर अमृताने अक्षयला पत्र लिहिलं.

हेही वाचा: Akshay Kelkar: आईनेच लावुन दिली सेटिंग! खुप मजेदार आहे ‘बिग बॉस’ विजेता अक्षयच्या पहिल्या प्रेमाची कहाणी

अमृता लिहिते,"बिग बॉस मराठी ४ ची ट्रॉफी जिंकल्याबद्दल तुझं अभिनंदन. एक प्रतिस्पर्धी म्हणून हे लिहिताना त्रास होत असला तरी एक मैत्रीण म्हणून खूप आनंद होतोय. बाकी आपण कायमच बेडीतले buddies असणार आहोत." असं पत्र अमृताने लिहिलं आहे. या दोघांनी एका कॅफेत एकमेकांची भेट घेतली. यावेळी अमृता - अक्षयने धम्माल मस्ती केली आणि एकत्र जेवणाचा आनंद घेतला.

बिग बॉस मराठी ४ च्या घरात जेव्हा बेडीतला टास्क झालेला तेव्हा अक्षय - अमृता एकमेकांसोबत बेडीत अडकले होते. त्यामुळे हे दोघे एकमेकांना बेडीतले buddies असं म्हणतात. बिग बॉसच्या घरात दोघांनी एकमेकांशी चांगली मैत्री केली. परंतु शेवटी शेवटी दोघांमध्ये खूप मतभेद झालेले.

अमृता देशमुख जेव्हा पुन्हा घरात आली तेव्हा तिने अक्षय सोबत बोलून तिची नाराजी स्पष्ट दाखवली. त्यामुळे हे दोघे एकमेकांसोबत बोलणार नाहीत असं अनेकांना वाटत होतं.

हेही वाचा: Samruddhi Kelkar: कीर्तीचं मालिकाविश्वात दमदार कमबॅक, आता दिसणार या भूमिकेत

अमृताने बिग बॉस संपल्यावर प्रसादची भेट घेतली. पण तिने अक्षयचा कुठेही उल्लेख केला नव्हता. पण आता अमृता आणि अक्षयने एकमेकांची भेट घेतल्यावर दोघांमध्ये कोणतेही मतभेद उरले नसून पुन्हा एकदा छान मैत्री झाली आहे, यावर शिक्कामोर्तब झाला आहे. अक्षय केळकर बिग बॉस मराठी ४ चा विजेता झाला. अमृता देशमुखचा मात्र बिग बॉसचा प्रवास अर्ध्यावर थांबला. परंतु अमृता बिग बॉस मधील सर्वांची लाडकी स्पर्धक होती.