bigg boss marathi 4: किरण मानेंना ठरवलं निरुपयोगी खेळाडू.. आता राडा तर होणारच! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bigg boss marathi 4 first task who is useless kiran mane

bigg boss marathi 4: किरण मानेंना ठरवलं निरुपयोगी खेळाडू.. आता राडा तर होणारच!

bigg boss marathi 4 : ज्या क्षणाची आपण सर्वच वाट पाहत होतो तो दिवस अखेर आलाच. बहुचर्चित आणि बहुप्रतिक्षित बिग बॉस मराठीचे चौथे पर्व काल 2 ऑक्टोबर रोजी सुरू झाले. ‘बिग बॉस’च्या तीन हिट पर्वानंतर सर्वचजण चौथे पर्व कधी सुरू होणार याची वाट पाहत होते. अखेर रविवारी 16 स्पर्धकांनी घरात प्रवेश केला. महेश मांजरेकर यांनी खुमासदार सूत्रसंचालन करत स्पर्धकांची फिरकी घेतली. आता बिग बॉसचं घर म्हणजे वाद, भांडण, दंगा तर होणारच, पण शक्यतो सुरुवातीचे दोन दिवस तरी बरे जातात. पण यंदा तर पाहिल्याच दिवशी वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे या ठिणगीचा वणवा होतो की आणखी काही हे आजच्या भागात कळणार आहे.

(bigg boss marathi 4 first task who is useless kiran mane)

काल दमदार नृत्य करत 16 स्पर्धकांनी बिग बॉसच्या घरात एंट्री घेतली. यामध्ये अपूर्वा नेमळेकर, किरण माने, तेजस्विनी लोणारी, प्रसाद जवादे, निखिल राजेशिर्के. अमृता धोंगदे, समृद्धी जाधव, अक्षय केळकर, योगेश जाधव, अमृता देशमुख, यशश्री मसूरकर, विकास सावंत, मेघा घाडगे, त्रिशूल मराठे, रुचिरा जाधव, डॉ. रोहित शिंदे अशा सोळा स्पर्धकांचा समवेश आहे. यातील काही चेहरे आपल्याला परिचित आहे. तर काही चेहरे हे कायमच वादग्रस्त चेहरे म्हणून समोर आले आहेत. आता पहिल्याच दिवशी ते काय राडा करणार हे लवकरच कळेल.

पहिल्या दिवशी बिग बॉसने या 16 जणांमध्ये चार ग्रुप केले. त्यानुसार प्रत्येक गटात 4 खेळाडू आहे. आता या चार खेळाडूंनी मिळून ठरवायचं आहे की आपल्या गटात कोणता खेळाडू निरुपयोगी आहे. नुकताच वाहिनीने एक प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये बिग बॉस आपल्या आवाजात म्हणतात प्रत्येक गटातील चारही सदस्यांनी मिळून ठरवायचं आहे की आपल्या गटातील कोणता खेळाडू निरुपयोगी आहे.

बिग बॉसच्या आदेशा नंतर त्यांच्यात चर्चा होते. त्यानंतर सामान्य नागरिक म्हणून घरात एंट्री मिळवलेला त्रिशूल म्हणतो आपल्या गटात किरण माने (kiran mane) निरुपयोगी आहेत, कारण आपण तरुण आहोत. त्यावर किरण माने म्हणतात मी काय म्हातारा वाटलो की काय.. तर दुसरीकडे अपूर्वा (apurva nemlekar) म्हणते मला प्रसाद जवादे निरुपयोगी वाटतो. मी इथे कुणाचीही मनं जपायला आलेली नाहीय. बिग बॉसने पहिल्याच दिवशी स्पर्धकांना असा टास्क दिला आहे की, यातून काहीतरी मोठा राडा होणार हे नक्की.

टॅग्स :bigg boss marathi