Bigg Boss Marathi 4: ज्यांच्यामुळे कॅप्टन झालास त्यांनाच तू.. मांजरेकरांनी रोहितची तासली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4 second week chawadi mahesh manjrekar called ungrateful to rohit shinde

Bigg Boss Marathi 4: ज्यांच्यामुळे कॅप्टन झालास त्यांनाच तू.. मांजरेकरांनी रोहितची तासली

bigg boss marathi S 4: सध्या बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा ट्विस्ट येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. घरामध्ये रोज नवीन वाद, नवा राडा होत आहे. आठवड्यात स्पर्धकांनी कितीही राडा घातला तरी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात ती शनिवारची. म्हणजे बिग बॉसच्या चावडीची. महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. काल बिग बॉस च्या घराची दुसरी चावडी पार पडली. महेश मांजरेकर या चावडीत कुणाला काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर काल मांजरेकरांनी सदस्यांच्या सर्व चुकांचा पाढा वाचला. (Bigg Boss Marathi 4 second week chawadi mahesh manjrekar called ungrateful to rohit shinde)

या आठवड्यात सर्व स्पर्धकांनी कॉमन मॅन बनून घरात (bigg boss marathi) धुडगूस घातला. स्पर्धकांनी अरेरावी करण्यापासून ते टास्कमध्ये धक्काबुक्की करेपर्यंत सर्व काही केलं. कधी कामावरून वाद झाले तर कधी काही सदस्यांना मुद्दाम डावललं गेलं. या सर्वाचा हिशोब काल मांजरेकरांनी चुकता केला. यावेळी टास्क दरम्यान प्रसादने मुद्दाम सदस्यांना अडवून धरल्याबद्दल त्याची चांगलीच शाळा लावली. प्रसादमुळे त्यांची टीम जिंकू शकली नाही असे त्यांनी स्पष्ट शब्दात ऐकवले. तर अपूर्वाचीही पुन्हा कानउघडणी केली.

या चावडीवर रोहितला मांजरेकरांनी चांगलेच सुनावले. यंदाच्या कॅप्टनसी कार्यात रोहित शिंदे जिंकला. पण त्याला त्यांच्या जवळच्या माणसांपेक्षा योगेश आणि विकास यांनी सर्वाधिक मदत केली. पण याच रोहित मात्र त्यांच्याप्रती कुठेही कृतज्ञ होताना दिसला नाही. किंबहुना त्यांचे आभारही मानले नाही. म्हणूनच महेश मांजरेकरांनी त्याला झापले. मांजरेकर म्हणाले, 'विकास आणि योगेशमुळे तू कॅप्टन झालास पण तू साध त्यांना पाणी सुद्धा विचारलं नाही. तू थेट जाऊन अक्षयला मिठी मारली. तू किती अनग्रेटफूल आहेस' अशा कडक शब्दात त्यांनी रोहितचा समाचार घेतला. आता आजच्या भागात बिग बॉस च्या घरातील एक स्पर्धक बाहेर जाणार आहे. तो कोण असेल ते हे कळेलच.