Bigg Boss Marathi 4: गद्दारांना ठेचण्याची हीच उत्तम संधी; आज होणार मोठ्ठा राडा.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bigg Boss Marathi 4 second week chawadi participants express their anger between task

Bigg Boss Marathi 4: गद्दारांना ठेचण्याची हीच उत्तम संधी; आज होणार मोठ्ठा राडा..

bigg boss marathi S 4: सध्या बिग बॉस मराठीच्या घरात रोज नवा ट्विस्ट येत आहे. बिग बॉस मराठीचे चौथे पर्व सुरू होऊन आता दोन आठवडे झाले आहेत. घरामध्ये रोज नवीन वाद, नवा राडा होत आहे. आठवड्यात स्पर्धकांनी कितीही राडा घातला तरी प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात ती शनिवार आणि रविवारची. म्हणजे बिग बॉसच्या चावडीची. महेश मांजरेकर सदस्यांची कशी शाळा लावतात हे पाहण्यासाठी सारेच उत्सुक असतात. काल बिग बॉस च्या घराची दुसरी चावडी पार पडली. महेश मांजरेकर या चावडीत कुणाला काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. अखेर काल मांजरेकरांनी सदस्यांच्या सर्व चुकांचा पाढा वाचला. तर आज बिग बॉसच्या घरात एक महत्वाचा टास्क होणार आहे. (Bigg Boss Marathi 4 second week chawadi participants express their anger between task )

रविवारच्या चावडीत एका स्पर्धकाला घर सोडावे लागते त्यामुळे हा दिवस अत्यंत निर्णायक असतो. शिवाय या दिवशी स्पर्धकांच्या मनातील राग बाहेर काढण्यासाठी बिग बॉस स्पर्धकांना एक टास्क देतात. या टास्क दरम्यान स्पर्धक आपला मनातील राग व्यक्त करत त्यामुळे हा दिवस मोठा राडा घडवणारा असतो.

आज बिग बॉसच्या (bigg boss marathi)घरात महेश मांजरेकर नवा टास्क देणार आहेत. याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या मध्ये महेश मांजरेकर स्पर्धकांना म्हणतात, 'मी तुम्हाला एक संधी देणार आहे. ज्याने गद्दारी केली त्याला उखळीत घालून ठेचा.' त्यामुळे या टास्क दरम्यान स्पर्धक राडा घालणार हे नक्की. कारण स्पर्धक आता कोणावर आपली भडास काढणार आहे हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. प्रोमो मध्ये दिसते की, यशश्री अमृताला ठेचते तर मेघा किरण मानेला ठेचते. आता या टास्क दरम्यान नेमकं कोण कुणाला काय बोलतय आणि काय राडा होतोय हे आजच्या भागात कळेल.

टॅग्स :Big Bossbigg boss marathi