Prasad Jawade - Amruta Deshmukh: बाहों में तुम अमृता... प्रसादची देशमुख साठी रोमँटिक कविता वाचली का?

अशातच प्रसादने अमृतासाठी एक खास कविता केलीय जी चर्चेत आलीय.
Prasad Jawade - Amruta Deshmukh, prasad jawade recite special romantic poem to amruta deshmukh
Prasad Jawade - Amruta Deshmukh, prasad jawade recite special romantic poem to amruta deshmukhSAKAL

Prasad Jawade - Amruta Deshmukh News: प्रसाद जवादे - अमृता देशमुख सोशल मीडियावर सध्या चर्चेत असलेली जोडी. प्रसाद - अमृता बिग बॉस नंतर सुद्धा चर्चेत आहेत. या दोघांमध्ये काहीतरी शिजतंय अशीही चर्चा आहे.

प्रसाद - अमृता बिग बॉस नंतर एकमेकांसोबत भटकंती करताना, इव्हेंटमध्ये एकत्र जाताना दिसतात. अशातच प्रसादने अमृतासाठी एक खास कविता केलीय जी चर्चेत आलीय.

(bigg boss marathi fame prasad jawade recite special romantic poem to amruta deshmukh)

Prasad Jawade - Amruta Deshmukh, prasad jawade recite special romantic poem to amruta deshmukh
प्राजक्ता ते शिवाली.. पहा आज Mothers Day निमित्ताने मराठी कलाकारांचे आईसोबतचे प्रेमळ फोटो

बिग बॉस मराठी ४’ मध्ये अमृता आणि प्रसाद जवादे यांची मैत्रीही चर्चेत आली. आता प्रसादने अमृताबद्दल त्याला काय वाटतं हे एका सुंदर कवितेतून व्यक्त केलं आहे.

एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत प्रसाद म्हणाला, “मी तिला कधीही बोलू नाही शकलो; पण तिच्यासाठी ही कविता सादर करायला मला आवडेल.

याशिवाय तिला हे सांगायला मला लाज नाही वाटणार कुठेही तुझ्यासाठी मी ही कविता बोललो आहे,” अशा भावना प्रसादने व्यक्त केल्या.

पुढे प्रसादने अमृतासाठी कविता म्हणाली की, “कैसे बताऊॅं….कैसे बताऊॅं अमृता मेरे लिए तुम कौन हो, तुम धडकनों का गीत हो, जीवन का तुम संगीत हो, तुम जिंदगी, तुम बंदगी, तुम रोशनी, तुम ताजगी,

तुम हर खुशी, तुम प्यार हो, तुम प्रीत हो, तुम गीत हो,

आँखो में तुम, यादों मे तुम , बाहों में तुम,

मैं जाऊ कहीं, तुम हो वहाॅं, तुम हो वही,

कैसे बताऊॅं मैं तुम्हें तुम मेरे लिए सब कुछ हो|”

अशाप्रकारे प्रसादने अमृतासाठी खास कविता म्हटली.

Prasad Jawade - Amruta Deshmukh, prasad jawade recite special romantic poem to amruta deshmukh
Adah Sharma: माझा दिवस इतका स्पेशल.. म्हणत The Kerala Story फेम अभिनेत्रीची खास मराठी पोस्ट

प्रसाद जवादे आणि अमृता देशमुख यांची भांडण - मिश्किल मैत्री बिग बॉस मराठी ४ च्या घरात पाहिली. प्रसाद आणि अमृता यांची मैत्री वाढली ती बिग बॉस मराठी ४ संपल्यावर.

हे दोघे एकमेकांसोबत छान वेळ घालवत आहेत. काही दिवसांपूर्वी या दोघांनी मुंबईत आलेल्या बॅकस्ट्रीट बॉईजच्या कॉन्सर्टला भेट दिली. तिथे या दोघांचा रोमँटिक अंदाज दिसून आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com