Utkarsh Shinde: 'न जेवताच मूठभर मास अंगावर चढलं' उत्कर्ष सोबत असं काय घडलं पुण्यात

पुण्यात जेवायला गेला आणि घडला एक प्रसंग, वाचा उत्कर्षचा हा किस्सा..
bigg boss marathi fame utkarsh shinde shared post about pune durvankur dining and fans reaction
bigg boss marathi fame utkarsh shinde shared post about pune durvankur dining and fans reaction sakal

utkarsh shinde : शिंदेशाहीतील एक महत्वाची व्यक्ती म्हणजे उत्कर्ष शिंदे. ज्येष्ठ गायक प्रल्हाद शिंदे यांचा नातू आणि आनंद शिंदे यांचा मुलगा उत्कर्ष शिंदे, शिंदेशाही गाण्याची ही परंपरा समर्थपणे पेलत आहे. बिग बॉस मराठीतून त्याची आणि आपली भेट झाली. त्याच्या दमदार खेळाने तो प्रेक्षकांच्या घरातच नाही तर मनात पोहोचला. उत्कर्ष डॉक्टरकी, गायन, लेखन, संगीत दिग्दर्शन अशा अनेक भूमिका पार पाडत आहे. उत्कर्ष एक उत्तम व्यक्ती असून सामाजिक आस्था बाळगणारा आहे. अनेकदा तो सामाजिक कार्यातही व्यस्त असतो. आज त्याने पुण्यात त्याच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला आहे. हा प्रसंग तुम्हालाही भावल्याशिवाय राहणार नाही. (bigg boss marathi fame utkarsh shinde shared post about pune durvankur dining and fans reaction )

उत्कर्ष सध्या सोनी मराठीवरील ज्ञानेश्वर माऊली या मालिकेत उत्सक संत चोखामेळांची भूमिका करत आहे. त्याच्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून तो पुण्यात गेला असता त्याने एका हॉटेलात जेवणाचा आस्वाद घेतला. यावेळी उत्कर्षला आलेला अनुभव त्याने शेअर केला आहे.

उत्कर्ष म्हणालाय, 'मूठभर मास अंगावर चढलं... मेडिकल कॉलेजच्या दिवसा पासून पुण्यात सिटी मध्ये गेलो कि आवर्जून गचागच भरलेल्या दुर्वाअंकुर डाईनिंग हॉल मध्ये जीवायची भलतीच मला आवड.चुटकी वाजून वाडपीला इशाऱ्याने सांगणारे वेटर ,मॅनेजर क्या बात ईतकी गर्दी मॅनेज करायची दुर्वाअंकुर डाईनिंग हॉलची एक वेगळीच स्टाईल .फरक इतकाच कि काल पर्यंत मला तिथे निवांत जेवता यायचं पण आता तिथे गेलो कि पोट तर नेहमी प्रमाणे पोट भरे पर्यंत जेवण तर होतंच,पण आता जेवताना तिथे आलेल्या गर्दीतुन प्रेम आशीर्वाद कौतुक ईतक मिळत कि तिथे पोटाची भूक भागतेच पण सोबतच मनः तृप्त होत ते काही औरच असत .

उत्कर्षने पुढे त्याला भेटलेल्या चाहत्यांचा अनुभव सांगितला आहे. तो म्हणतो, 'आता ह्या काकू (जोशी कि देसाई कि नेने )नाव काही आठवत नाही .पण पेठे मधल्या काकू हे जाणवलं आणि त्यांच्या सोबतच्या त्या ताई भेटल्या मी जेवत असताना प्रेमाने आल्या खांद्यावर हाथ ठेऊन उत्कर्ष शिंदे ना ?असा प्रश्न विचाराला आणि मी हो म्हणताच .कौतुकाचा अक्षरशः पाऊस माझ्या वर त्यांनी पाडला .”तू “ म्हंटलं तर चालेल ना असा विचारताच .तू आमच्या परिवारातील ,घरातला वाटतोस म्हणून तू जिवतोयेस तरीही तुला जेवत असताना बोलायाला आम्ही आलो , तू किती उत्तम आहेस,आम्हला आवडतोस तुझ्या साठीच आम्ही बिगबॉस बघायचो.आणि आता तु ज्ञानेश्वर माऊलीतली संत चोखा मेळा भूमिका हि किती सुंदर केलीस अस म्हणत भरभरून कौतुक करत नजरच काढली .मायेने डोक्यावरून हाथ फिरवल आशीर्वाद दिले आणि गेल्या .आणि माझं मात्र जेवणा आधीच ते म्हणतात ना “मूठभर मास अंगावर चढलं “ होत आणि मध्ये मध्ये उठून खरकट्या हाताने बाकी सर्वाना सोबत सेल्फी देत देत जेवण पूर्ण केलं .पदोपदी रसिक माय बापाचं मिळत असलेलं अथांग प्रेम लाभत आहे ह्या पेक्षा एका कलाकाराला आणखीन काय हवं. पोटोबा तृप्त मनः पण तृप्त..' उत्कर्षची ही पोस्ट सध्या बरीच व्हायरल होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com