यंदाचा सिझन होणार झकास, पाहा बिग बॉस...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 18 मे 2019

'बिग बॉस'साठी एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील. या वेळी कोण कोण बिग बॉसच्या घरात जाणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. 

मुंबई : प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हिजनवरचा सगळ्यात उत्कंठावर्धक रिऍलिटी शो 'मराठी बिग बॉस'च्या दुसऱ्या सीझनचा पडदा 26 मे ला उघडणार आहे. प्रसिद्ध अभिनेते व दिग्दर्शक महेश मांजरेकर या शोचे सूत्रसंचालन करणार आहे. 

बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या सीझनमध्ये विविध क्षेत्रातील 15 लोकप्रिय व्यक्तिमत्त्व घरामध्ये सदस्य म्हणून जाणार आहेत. याव्यतिरिक्त प्रेक्षकांसाठी एक मोठं सरप्राईज असणार आहे आणि ते म्हणजे बिग बॉसचे घर जे तब्बल 14,000 चौरस फूट अशा भव्य जागेमध्ये तयार करण्यात आले आहे. या घराला आलिशान अस्सल मराठमोळ्या वाड्याचे स्वरुप देण्यात आले आहे.

याव्यतिरिक्त एक भव्य सेट तयार करण्यात आला आहे ज्याद्वारे महेश मांजरेकर स्पर्धकांशी संवाद साधतील. या वेळी कोण कोण बिग बॉसच्या घरात जाणार हे गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. 

महेश मांजरेकर याबाबत बोलताना म्हणाले, "बिग बॉस मराठी हा मराठी टेलिव्हीजनवरील सगळ्यात महत्त्वाचा शो आहे असं मला वाटतं, कारण या कार्यक्रमामुळे आपल्याला माणसं खऱ्या आयुष्यात कशी आहेत ते बघायला मिळतं. घरामध्ये घडणाऱ्या घटनांमुळे चेहऱ्यावर असलेले मुखवटे काही क्षणातच पूर्णपणे उतरून जातात. आणि यामुळेच हा शो प्रेक्षकांना खरा वाटतो. माझ्या चाहत्यांना कार्यक्रमाबद्दल खूपच उत्सुकता आहे, मला खात्री आहे पहिल्या सिझनप्रमाणे हा सिझनदेखील त्यांच्या पसंतीस उतरेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bigg Boss Marathi season 2 starts from 26 May