'बिग बॉस मराठी' विजेता शिव ठाकरे याच्या गाडीचा अपघात | Shiv Thakare | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shiv Thakare

'बिग बॉस मराठी' विजेता शिव ठाकरे याच्या गाडीचा अपघात

'बिग बॉस मराठी २' चा विजेता शिव ठाकरे हा सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. २० नोव्हेंबर रोजी शिवच्या गाडीचा अपघात झाला आहे. शिव ठाकरे त्याच्या कुटुंबियांसोबत अमरावतीहून प्रवासासाठी निघाला असताना वळगाव येथे त्याच्या गाडीला एका टेम्पो ट्रॅव्हलरने मागून धडक दिली. या अपघातातून शिव आणि त्याचे कुटुंबीय थोडक्यात बचावले आहेत. मात्र शिवच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे.

शिव हा त्याच्या कुटुंबियांसोबत अमरावतीहून अचलपूरकडे जात असताना वळगावच्या जवळ एका टेम्पो ट्रॅव्हलरने त्यांच्या गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की शिवची गाडी रस्त्याच्या बाजूला असलेल्या शेतात आडवी झाली. या दुर्घटनेत शिवसोबतच त्याच्या आई आणि बहिणीला देखील दुखापत झाली आहे. त्याचबरोबर शिवच्या गाडीचा मागचा भाग वाईटरीत्या दबला गेला आहे. त्याचा अपघातानंतरचा एक फोटो सोशल मीडियावर वायरल झाला आहे. शिवच्या चाहत्यांना ही बातमी कळताच त्याचे चाहते शिव आणि त्याच्या कुटुंबियांसाठी प्रार्थना करत आहेत.

शिव 'बिग बॉस मराठी २'चा विजेता असून त्यापूर्वी तो एमटीव्ही रोडीजमध्ये दिसला होता.बिग बॉसच्या घरात शिव आणि वीणा जगताप यांची प्रेमकहानी चांगलीच चर्चेत आली होती. पण, सध्या सोशल मीडियावर वीणा आणि शिव यांचा ब्रेकअप झालं असल्याच्या चर्चा आहेत.

loading image
go to top