esakal | Bigg Boss OTT: 'प्रतिकनं निक्कीला सगळ्यांसमोर'...
sakal

बोलून बातमी शोधा

actress nikki tamboli

Bigg Boss OTT: 'प्रतिकनं निक्कीला सगळ्यांसमोर'...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

बिग बॉस ओटीटी (Bigg Boss OTT) मध्ये दरवेळी नव्यानं काही घडत असतं. ज्यामध्ये प्रेक्षकांना आणि त्या शो च्या चाहत्यांना कमालीची उत्सुकता असते. त्याचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतात. बिग बॉसला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळताना दिसून आलं आहे. त्याचा चाहतावर्गही मोठा आहे. या शो मध्ये सहभागी झालेले स्पर्धक हे नेहमी एकमेकांशी भांडताना दिसतात. त्यांच्यातील वाद, एकमेकांवर केलेले आरोप चाहत्यांच्या चर्चेचा विषय असतात. काही वेळा त्या शो मधील व्हिडिओही चाहत्यांची पसंती मिळवतात. आता मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री निक्की तांबोळीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यावरुन तिला ट्रोलही करण्यात आलं आहे. सध्या त्या व्हिडिओची मोठ्या प्रमाणात चर्चा आहे.

बिग बॉस ओटीटीमध्ये अनेक घडामोडी घडल्या आहेत. त्या शो मधून काही स्पर्धक हे बाहेरही पडले आहेत. अनेकांचे वाद झाले आहेत. यासगळ्यात निक्की तांबोळी आणि प्रतिकचा एक व्हिडिओही व्हायरल झाला आहे. यावेळी संडे वॉरमध्ये मिलिंद गाबा गाबा (Millind Gaba) आणि अक्षरा सिंग (Akshara Singh) हे दोन्ही स्पर्धक बाहेर जाताना दाखवण्यात आले आहेत. या प्रोमोमध्ये आपल्याला दिसून येते की, निक्की तांबोळी आणि रुबीना दिलेक या एका बॉक्समध्ये उभ्या आहेत. त्यावेळी निक्की प्रतिकला बोलावते आणि त्याच्याशी काही बोलते. तिला त्याच्याशी काही पर्सनल बोलायचं आहे. त्यावेळी जे घडलं त्यावरुन सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे. त्या व्हिडिओवर अनेकांनी निक्की आणि प्रतिकला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत.

त्या प्रोमोला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे. गेल्या काही दिवसांपासून बिग बॉस ओटीटीची क्रेझ वाढताना दिसत आहे. निक्कीला प्रतिकनं किस केलं आहे. ज्यावरुन त्यानं आपल्याला जबरदस्तीनं किस केलं असं निक्कीचं म्हणणं आहे. निक्कीच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचं झाल्यास बिग बॉस ओटीटीमध्ये सहभागी झाल्यानंतर तिच्याकडे विशेष काही प्रोजेक्ट नाही. निक्की काही दिवसांपूर्वी खतरो के खिलाडीमध्ये दिसली होती. तिथं तिनं चाहत्यांची मोठ्या प्रमाणावर लोकप्रियता मिळवली होती. रूबीनाविषयी बोलायचं झाल्यास ती शक्ति - अस्तित्व के अहसासमध्ये दिसली होती. तिचा मरजानिया नावाचा एक व्हिडिओही प्रदर्शित झाला होता. त्याला चाहत्यांनी चांगला प्रतिसाद दिला होता. त्यात तिच्या जोडीला अभिनव शुक्लाही होता.

हेही वाचा: 'निक्की तुला लाज कशी वाटत नाही, असे कपडे घालायला'

हेही वाचा: Khatron Ke Khiladi 11: सापांसोबत खेळतेय निक्की, डोळ्यावर झुरळं

loading image
go to top