
भारतीय सिनेसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचा जीवनपट
दादासाहेब फाळके यांचा आज स्मृतिदिन. दादासाहेब हे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक, भारतीय चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि पटकथाकार होते. थोडक्यात काय तर ते चित्रपट महर्षी म्हणूनही ओळखले जातात.
दादासाहेबांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे झाला. दादासाहेबांना लहानपणापासूनच वेगवेगळ्या कला शिकण्याची आवड होती. त्यामुळे मराठा हायस्कूल, मुंबई येथे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर 1885 मध्ये त्यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्ट्स येथून एक वर्षाचा चित्रकलेचा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर त्यांनी तैलरंगचित्रण, जलरंगचित्रण, वास्तुकला आणि नमुना प्रतिरूपण (मॉडेलिंग) यामध्ये सण 1890 ला प्रावीण्य मिळवले .
पुढे दादासाहेब आपण स्वदेशी चित्रपट बनवायचा या विचाराने झपाटून गेले. आणि काही दिवसातच त्यांनी मुंबई (दादर) येथे फाळके चित्रपटनिर्मितिगृहाची स्थापना केली आणि सहा महिन्यात मुंबईच्या कोरोनेशन चित्रपटगृहामध्ये 1913 पहिला मूक चित्रपट तयार केला.त्याच नाव आहे ‘राजा हरिश्चंद्र‘ (Raja Harishchandra) हा चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील पहिला चित्रपट आहे.
हेही वाचा: दादासाहेब फाळके यांना भारतरत्न द्या!

आपल्या 19 वर्षांच्या कारकिर्दीत 1937 पर्यंत दादासाहेब फाळकेंनी सुमारे 95 चित्रपट आणि 26 लघुपटांची निर्मिती केली.
दादासाहेबांच्या या धडपडीमागे त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई (दुसरी पत्नी) यांची मोलाची साथ होती. आपल्या पतीचे स्वप्नं सत्यात उतरविण्यासाठी सरस्वतीबाईंनी आपले दागिने देखील विकले.
चित्रपटाशी संबंधित लोकांचा स्वयंपाक करणे, त्यांचे कपडे धुणे, त्यांच्या राहण्याची सोय करणे, शिवाय हे करून चित्रपटाशी संबंधित एडिटिंग, मिक्सिंग, फिल्म डेव्हलपिंग, कॅमेरा असिस्टंट, स्पॉट बॉय या भूमिका देखील त्यांनी पार पाडल्या.
रात्री सर्व मंडळी झोपल्यानंतर त्या चित्रपटाशी संबंधित समस्यांवर आपल्या पती आणि इतर सहकाऱ्यांसमवेत होणाऱ्या चर्चेत देखील सहभागी होत.
हेही वाचा: दादासाहेब फाळके चित्रपट महोत्सवात ‘पाऊली’ खणाणली

सरस्वती बाईंच्या सहकार्याशिवाय हा चित्रपट तयारच होऊ शकला नसता. असे फाळकेनी एका मुलाखतीत सांगितले होते.
दादासाहेब फाळकेंनी चित्रपट तयार करायला सुरूवात केल्यानंतर त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारायला लागली. तसेच त्यांच्या अनेक चित्रपटांनी थिअटरला चांगली कमाई देखील केली. त्या काळात त्या चित्रपटातून इतके पैसे मिळाले की त्यांच्याल घरी बैलगाडीभरून पैसे येतं होते.
पुढे दादासाहेब फाळके यांच्या जीवनावर ‘हरिश्चंद्राची फैक्ट्री’ हा चित्रपट बनविण्यात आलाय. यात चित्रपटात दादासाहेबांनी पहिल्या चित्रपटनिर्मितीमागील धडपड दाखवलेली आहे.
असं देखील सांगितल जातं की महिलांना चित्रपटात काम करण्याची पहिली संधी दादासाहेब फाळके यांच्यामुळे मिळाली आहे. त्यांच्या 'भस्मासूर मोहिनी' मध्ये दुर्गा आणि कमला या दोन महिलांनी काम केलं होतं.

दादासाहेब फाळके उत्तम फोटोग्राफर सुध्दा होते.
कलेचे प्रचंड वेड असलेल्या फाळकेंनी चित्रकला, वास्तुकला, प्रोसेस फोटोग्राफी अशा अनेक कला आत्मसात केल्या. गुजरातमधील गोध्रा येथे त्यांनी फोटोग्राफर म्हणून काही काळ काम देखील केलेलं आहे.
दादासाहेब फाळके पुरस्कार” हा भारतीय चित्रपट सृष्टीत असामान्य कामगिरी करणाऱ्या कलावंत आणि तंत्रज्ञांना भारत सरकारच्या वतीनं दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे. 1969 या दादासाहेब फाळके यांच्या जन्मशताब्दी वर्षापासून हा पुरस्कार दिल्या जात आहे. भारत सरकारच्या माहिती आणि नभोवाणी खात्यातर्फे हा पुरस्कार प्रदान केला जातो. दरवर्षी भरविण्यात येणाऱ्या राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यात हा पुरस्कार देण्यात येतो.
भारतीय चित्रपट व्यवसायाला पंचवीस वर्षे पूर्ण झाली म्हणून 1939 च्या एप्रिल-मेमध्ये मुंबईत एक महोत्सव साजरा करण्यात आला. त्यावेळी फाळक्यांचा सत्कार करून कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून त्यांना पाच हजार रूपयांची थैली अर्पण करण्यात आली.
त्यानंतर पुढे काही वर्षातच प्रतिभाशाली व्यक्तिमत्वाचे वयाच्या 74वर्षी म्हणजे 16फेब्रुवारी 1944 निधन झाले.
Web Title: Biography Of Dadasaheb Phalke The Father Of Indian Cinema
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..