Bipasha Basu pregnancy: अखेर बिपाशाने दिली गुड न्यूज, बेबी बंपचे फोटो व्हायरल..

लग्नानंतर सहा वर्षांनी बिपाशा आणि करणने आई बाबा होण्याचा निर्णय घेतला असून अखेर आज ही गोड बातमी दिली.
Bipasha Basu and Karan Singh Grover announce pregnancy: shared baby bump photo and sai Our baby will join us soon and add to our glee
Bipasha Basu and Karan Singh Grover announce pregnancy: shared baby bump photo and sai Our baby will join us soon and add to our glee
Updated on

Bipasha Basu pregnancy: बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) यांनी अखेर ते आई-बाबा होणार असल्याची घोषणा केली आहे. गेले काही दिवस बिपाशा प्रेग्नंट असल्याची चर्चा होती, पण बिपाशा आणि करण दोघांपैकी कुणीही याबाबत अधिकृत माहिती दिली नव्हती. अखेर आज बिपाशा आणि कारण दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन बिपाशाच्या बेबी बंपचा फोटो शेयर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. (Bipasha Basu and Karan Singh Grover announce pregnancy: shared baby bump photo and sai Our baby will join us soon and add to our glee)

बिपाशा आणि करण दोघांच्याही चेहऱ्यावर आईृ-बाबा होणार असल्याचा आनंद ओसंडून वाहत आहे. बिपाशा आणि करण यांनी दोघांनीही एक पोस्ट शेयर केली आहे, ज्यामध्ये आपल्या बेबी बंसह बिपाशा आणि करण एकत्र दिसत आहे. या फोटोमध्ये करण बिपाशाला घट्ट मिठी मारून उभा आहे. बिपाशा आणि करणची भेट २०१५ मध्ये 'अलोन' च्या सेटवर झाली. आणि इथेच दोघांमध्ये आधी मैत्री,त्यानंतर प्रेमाचं नातं फुललं. २०१६ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. आणि लग्नानंतर सहा वर्षांनी बिपाशा आणि करणने आई बाबा होण्याचा निर्णय घेतला असून अखेर आज ही गोड बातमी दिली.

एक पोस्ट शेयर करत बिपाशाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. ती म्हणते, 'नवी वेळ, नवी सुरुवात आणि नवा प्रकाश आमच्या आयुष्यामध्ये आला आहे. आम्ही दोघांनी नव्या आयुष्याला सुरुवात केली आणि तेव्हापासून आम्ही फक्त दोघंच आहोत. एकमेकांवरच खूप प्रेम करायचं हे थोडं आता अयोग्य वाटलं. म्हणून आता लवकरच आम्ही दोनाचे तीन होणार आहोत. लवकरच आमचं बाळ आमच्याबरोबर असेल आणि आमचा आनंद द्विगुणीत होईल.' असे बिपाशा म्हणते.

पुढे ती म्हणते, 'तुम्ही आमच्यावर बिनशर्त प्रेम केल्याबद्दल, तुमच्या प्रार्थना आणि शुभेच्छांबद्दल धन्यवाद, त्या कायमच आमच्या सोबत असतील. आमच्या जीवनाचा एक भाग बनल्याबद्दल धन्यवाद.. लवकरच आमच्यासोबत एक जीव जोडला जाणार आहे ते म्हणजे आमचं बाळ.. दुर्गा दुर्गा' तिच्या या शब्दांवरून बिपाशाला झालेला आनंद आपल्या लक्षात येतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com