Bipasha Basu Baby: बिपाशानं ठेवलं मूलीचं अनोखं नाव! खास फोटो शेअर करत दिली माहिती... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bipasha Basu Baby

Bipasha Basu Baby: बिपाशानं ठेवलं मूलीचं अनोखं नाव! खास फोटो शेअर करत दिली माहिती...

आलिया रणबीरनंतर बिपाशा आणि करण याच्या घरीही एक छोटी परी आली आहे. या जोडप्याने आज एका गोंडस मुलीचे स्वागत केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोव्हर हे मागील काही दिवसांपासून बरेच  चर्चेत होते. त्यांच्या पहिल्या बाळाच्या स्वागतासाठी ते उत्सूक होते. बिपाशा बासूने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. हे स्टार कपल आपल्या मुलीच्या जन्मामुळे खूप आनंदी आहे. 

बिपाशा आणि करण सिंग ग्रोव्हरने या वर्षी ऑगस्टमध्ये मॅटर्निटी फोटोशूटमधील एक फोटो शेअर करून गरोदरपणाची घोषणा केली होती. त्यांनतर बिपाशा बासूने तिच्या पहिल्या बाळाला जन्म दिला आहे. बिपाशाने इंस्टाग्रामवर ही बातमी शेअर करत तिच्या मुलीचे नाव काय ठेवले आहे याचाही खुलासा केला आहे.

हेही वाचा: हिंदी चित्रपटांत का वाढते आहे हिंदुत्वाची कट्टरता?

बिपाशा आणि करणने आपल्या मुलीच्या पायाचा फोटो शेअर करत मुलीच्या नावाचीही घोषणा केली. या जोडप्याने त्यांच्या मुलीचं नाव 'देवी' ठेवलं आहे. 'देवी बासू सिंग ग्रोव्हर' असं तिचं पुर्ण नाव आहे आजची तारीख १२-११-२२  या फोटोवर दिसतेय.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये बिपाशा आणि करणने असे म्हटले आहे की, 'देवी बासू सिंग ग्रोव्हर- आमचं प्रेमाचे आणि आईच्या आशीर्वादाचे भौतिक स्वरुप सत्यात उतरले आहे आणि ती दैवी आहे.' तिने दुर्गामातेच्या नावावरुनच मुलीचे नावही देवी ठेवले आहे.

अनेकांनी देवी या नावाचे कौतुक केले आहे, तर तिचे स्वागत केले आहे. बिपाशा-करणवर  मित्रपरिवार शूभेच्छाचा वर्षाव करत आहे.काही वेळातच देवीचा हा फोटो व्हायरल होत असून या पोस्टला लाइक्स केले जात आहे.

हेही वाचा: Bipasha Basu Baby: बिपाशाची इच्छा पुर्ण! बिपाशा करणला कन्यारत्नांची प्राप्ती..

करण आणि बिपाशाने 30 एप्रिल 2016 रोजी लग्नगाठ बांधली होती. ते त्यांच्या 2015 मध्ये आलेल्या अलोन चित्रपटाच्या सेटवर प्रेमात पडले होते. त्यानंतर प्रेमात पडल्यानंतर या जोडप्याने पुढील वर्षीच लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर ६ वर्षांनी त्यांच्यावर मुलीची जबाबदारी पडली आहे. बिपाशाने अनेकदा मॅटर्निटी शूट केले आहेत, जेव्हा तिचे फोटो समोर आले, तेव्हा तिला खूप कौतुक मिळाले. तिने तिच्या प्रेग्नेंसीशी संबंधित काही व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केले आहेत. 

हेही वाचा: Bipasha Basu: आलियानंतर बिपाशा म्हणतेय, ‘ बेबी ऑन द वे’! लवकरच देणार गोड बातमी...