
Bipasha Basu Birthday : करियर संपलं पण बिपाशा आजही कमवते करोडो रुपये, संपत्ती जाणून बसेल धक्का
Bipasha Basu Birthday : आज चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध व्यक्तिमत्त्व बिपाशा बसू यांचा वाढदिवस आहे. बॉलिवूडची ही ब्युटी क्वीन अनेकदा तिच्या लूक आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. बिपाशा बसूने 2016 मध्ये टीव्ही मालिकेत आपली छाप पाडणाऱ्या करण सिंग ग्रोवरसोबत लग्न केले. बिपाशा आणि करणची गणना खूप श्रीमंत जोडप्यांमध्ये केली जाते. बिपाशाने चित्रपटांच्या दुनियेत खूप नाव कमावले आहे पण तुम्हाला माहिती आहे का या अभिनेत्रीची एकूण संपत्ती किती आहे? त्याच्या एकूण संपत्तीबद्दल जाणून घेऊया.
हेही वाचा: Kamshet Trip : आपल्या पार्टनर सोबत पॅराग्लायडिंगची मजा घ्या तीही पुण्यापासून अगदीच जवळ
बिपाशा बसू मुख्यतः तिच्या चित्रपट आणि जाहिरातींमधून मोठी कमाई करते. बिपाशा तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी करोडो रुपये मानधन घेते. बिपाशा बसूची एकूण संपत्ती 15 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 113 कोटी रुपये आहे.
हेही वाचा: Travel In Pune : पुण्यातल्या पुण्यातच विकेंड प्लॅन करायचा आहे? मग पू.ल देशपांडे उद्यान आहे बेस्ट
यासोबतच बिपाशा बसूचे मुंबई (वांद्रे) येथे 16 कोटी रुपयांचे आलिशान घर आहे, ज्यामध्ये ती तिच्या पतीसोबत आनंदी जीवन जगत आहे. जर तिच्या कार कलेक्शनबद्दल सांगायचं झालं तर, बिपाशाकडे ऑडी क्यू, 25 लाख किमतीच्या फोक्सवॅगन बीटल आणि 28 लाख किमतीच्या टोयोटा फॉर्च्युनर सारख्या आलिशान कार आहेत.