Bipasha Basu: बंगालच्या या ब्लॅक ब्युटीने गोऱ्याचिट्ट्या अभिनेत्रींचं मार्केट केलं होतं डाउन..

बॉलिवूड गाजवणाऱ्या बंगाली ब्युटी बिपाशा बासूचा आज वाढदिवस, जाणून ही खास बात..
Bipasha Basu career success stroy personal life style movie bollywood
Bipasha Basu career success stroy personal life style movie bollywoodsakal

Bipasha Basu: बॉलिवूडची बंगाली ब्युटी म्हणजेच बिपाशा बासू आज तिचा ४४ वा वाढदिवस साजरा करत आहे. बिपाशाचा जन्म 7 जानेवारी 1979 रोजी बंगाली कुटुंबात झाला होता. बिपाशा बासू एक अशी अभिनेत्री आहे जी तिच्या अभिनयाने आणि लव्ह स्टोरी ने नेहमीच चर्चेत असते. बिपाशा बासूच्या वाढदिवशी तिच्या करिअर आणि लव्‍ह लाइफबद्दल पाहुया.

(Bipasha Basu career success stroy personal life style movie bollywood)

Bipasha Basu career success stroy personal life style movie bollywood
Dhishkyaoon: प्रथमेश परब करणार प्रेमाचा गेम! 'ढिशक्यांव' चित्रपटाचा भन्नाट टिझर पहाच..

बिपाशा बासू हिने कधीच विचार केला नव्हता की, ती मोठेपणी अभिनेत्री होईल. बिपाशाला वाटत होते की, ती सुंदर दिसत नाही. बिपाशा बासू हिला डाॅक्टर व्हायचे होते. परंतू अचानक तिला मॉडलिंग करण्याची इच्छा झाली.आज बिपाशा बासू चित्रपटापासून दूर आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा चाहते चित्रपटांमध्ये तिचा अभिनय आणि बोल्ड स्टाइल पाहण्यासाठी उत्सुक असायचे.

Bipasha Basu career success stroy personal life style movie bollywood
Prajakta Mali: उद्घाटनाला राज.. ब्रँडच्या नावातही राज.. काय आहे प्राजक्ता माळीचं 'राज' कनेक्शन?

बिपाशा बसूने वयाच्या १७ व्या वर्षी मॉडेलिंगपासून करिअरची सुरुवात केली होती. चित्रपटात येणे तिच्यासाठी खूप कठीण होते. बिपाशाने 2001 मध्ये 'अजनबी' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.पण त्याआधी बिपाशाने सोनू निगमच्या 'जान' व्हिडिओ अल्बममध्ये काम केले होते. ती दोन गाण्यांमध्ये दिसली. दोन्ही गाणी इतकी हिट झाली की आजही ती खूप गायली जातात. विशेषतः 90 च्या दशकातील तरुणांना या गाण्यंची विशेष आवड होती.

त्यानंतर तिने राझ, जिस्म, नो एंट्री, धूम 2, फिर हेरा फेरी, बचना ए हसीनो यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. बॉलिवूड व्यतिरिक्त, अभिनेत्रीने तमिळ, तेलुगु आणि बंगाली चित्रपटांमध्येही आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयावर छाप सोडली. बिपाशा बासूचा 'कॉर्पोरेट' चित्रपटातील तिची भूमिका वेगळी होती नेहमी बोल्ड स्टाइलने असणारी बिपाशा त्यामध्ये शांत आणि यशस्वी बिझनेस वूमन होती.

बिपाशाने शेवटचा चित्रपट 'अलोन' होता. या चित्रपटात त्याच्यासोबत करण सिंग ग्रोव्हर होता. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान बिपाशा आणि करण एकमेकांच्या प्रेमात पडले. त्यानंतर 2016 मध्ये त्यांनी लग्न केले.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

करण सिंग ग्रोव्हरच्या आधी बिपाशाचे नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले आहे. एक काळ असा होता की बिपाशा आणि राणा डग्गुबती यांच्या प्रेमाच्या कथा खूप ऐकल्या होत्या. दोघांच्या अफेअरच्या बातम्या झळकू लागल्या होत्या. यानंतर बिपाशाच्या आयुष्यात डिनो मोरिया आला, पण हे नातेही लवकरच संपुष्टात आले. त्यानंतर एक वेळ अशी आली की जॉन अब्राहम आणि बिपाशा यांच्या प्रेमाची चर्चा सर्वत्र होती.

त्यावेळी बिपाशा आणि जॉनला बी-टाऊनचे हॉट कपल म्हटले जात होते. दोघांचे नाते जवळपास 10 वर्षे टिकले, पण एके दिवशी जॉन अब्राहमने मीडियाला सांगितले की, तो आणि बिपाशा आता वेगळे झाले आहेत. इतकेच नव्हेतर बिपाशा बसूचे नाव जगातील दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डोसोबतही जोडले गेले आहे. स्टार फुटबॉलर रोनाल्डो आणि बिपाशा यांच्यात चुंबन झाल्याची चर्चा झाली होती.

बिपाशा बासू शेवटची चित्रपट 'अलोन' मध्ये दिसली. आता ती आई झाली आहे तिला मुलगी झाली आहे आणि मुलींचं नाव 'देवी 'आहे. सध्या बिपाशा मुली बरोबर मातृत्वाचा आनंद घेत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com