Bipasha Basu च्या घरी लवकरच हालणार पाळणा!,6 वर्षानंतर अभिनेत्री बनणार आई Karan Singh Grover | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bipasha Basu Is Pregnant With Her First Child, After 6 Years Of Marriage

Bipasha Basu च्या घरी लवकरच हालणार पाळणा!,6 वर्षानंतर अभिनेत्री बनणार आई

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि करण सिंग ग्रोव्हर (Karan Singh Grover) लवकरच आई-वडील बनणार आहेत. बिपाशा आणि करण लवकरच यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. पिंकविला वेबासाईटला एका सूत्राने माहिती दिली आहे की बिपाशा आणि करण खूपच आनंदात आहेत. आईृ-बाबा बनण्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत आहे. बिपाशा आणि करणची भेट २०१५ मध्ये 'अलोन' च्या सेटवर झाली. आणि इथेच दोघांमध्ये आधी मैत्री,त्यानंतर प्रेमाचं नातं फुललं. २०१६ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती.(Bipasha Basu Is Pregnant With Her First Child, After 6 Years Of Marriage)

हेही वाचा: 95 करोडच्या विक्रांत रोना सिनेमाला रिलीजनंतर तासाभरातच मोठा फटका,जाणून घ्या

सूत्रांच्या म्हणण्यानुसार बातमी आहे की दोघंही सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवरच आपल्या आयुष्यातील हा मोठा आनंद शेअर करण्याची शक्यता आहे. याआधी यावर्षात मार्च महिन्यातही बिपाशा बासू गरोदर(Pregnant) असल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ती एके ठिकाणी कुटुंबासोत डिनरला गेली असाना तिला ज्या ड्रेसमध्ये स्पॉट केलं गेलं त्याला पाहून सर्वांनी ती प्रेग्नेंट असल्याचा अंदाज लावला होता. तिने त्यावेळी सैलसर ड्रेस घातला होता.

हेही वाचा: Kapil Sharma ला 'गदर'च्या सेटवर झालेली मारहाण,हाकलूनही दिलेलं, मोठा खुलासा

बिपाशा लग्नाआधी काही वर्ष जॉन अब्राहमसोबत रिलेशनशीपमध्ये होती. माहितीनुसार, १९९६ ते २००२ पर्यंत ती डिनो मोरियाला डेट करत होती. तर २००२ ते २०११ पर्यंत ती जॉन अब्राहमसोबत रिलेशनशीपमध्ये होती. हरमन बावेजा सोबतही तिचं अफेअर सुरु असल्याच्या बातम्या होत्या. तर दुसरीकडे करण सिंग ग्रोव्हरने २००८ मध्ये श्रद्धा निगमसोबत लग्न केलं, पण त्यांचा लवकरच घटस्फोट झाला. २०१२ मध्ये करणने जेनिफर विंगलेटसोबत लग्न केलं पण २०१४ मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर त्याने तिसरं लग्न बिपाशा सोबत केलं .

हेही वाचा: BJP नेत्याची अक्षय कुमारला अटक करण्याची मागणी, राम सेतू सिनेमानं उडाला भडका

करण सिंग ग्रोव्हर हे छोट्या पडद्यावरचं मोठं नाव आहे. त्याने 'कसोटी जिंदगी की', 'परिवार', 'दिल मिल गए', 'जरा नचके दिखा', 'झलक दिखला जा ३', 'फियर फॅक्टर-खतरों के खिलाडी ३', 'कबूल है' सारख्या कितीतरी मोठ्या मालिका आणि रिअॅलिटी शो मधून काम केलं आहे. त्यानंतर तो 'अलोन' आणि 'हेट स्टोरी ३' मध्ये दिसला होता. तर बिपाशाने देखील अनेक सिनेमांतून काम केले आहे. 'राज' ,'जिस्म','नो एंट्री','धूम २' ,'अजनबी' अशा कितीतरी मोठ्या सिनेमातून तिनं बड्या स्टार्ससोबत काम केलं आहे. करण आणि बिपाशाने २०२० मध्ये 'डेंजरस' या वेबसिरीजमध्येही काम केलं आहे.

Web Title: Bipasha Basu Is Pregnant With Her First Child After 6 Years Of Marriage

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top