Bipasha Basu: सुरुवातीचे काही महिने खूपच कठीण होते , गरोदर बिपाशा बासू म्हणाली... Bipasha on Pregnancy | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bipasha Basu opens up on her pregnancy

Bipasha Basu: सुरुवातीचे काही महिने खूपच कठीण होते , गरोदर बिपाशा बासू म्हणाली...

Bipasha Basu: अभिनेत्री बिपाशा बासू लवकरच आई होणार आहे. नुकतंच बिपाशाचं डोहाळे जेवण मोठ्या थाटामाटात पार पडलं. तिच्या डोहाळे जेवणाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरलही झाले होते. ज्यात बिपाशा आणि तिचा पती करण सिंग ग्रोवर खूपच आनंदात दिसत आहेत. 43 व्या वर्षी बिपाशा बासू आई होणार आहे त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर आनंद झळकत असला तरी गरोदरपणातील सुरुवातीचे काही महिने तिच्यासाठी सोपे नव्हते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत बिपाशाने गरोदरपणातील सुरुवातीचा काळ तिच्यासाठी खूपच कठीण असल्याच सांगितलंय.(Bipasha Basu opens up on her pregnancy)

हेही वाचा: Boycott Vikram Vedha: 'मुलाचं नाव राम तर नाही ठेवणार...', सैफच्या व्हिडीओनं खळबळ

गेल्या महिन्यातच बिपाशा आणि करणने सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली होती. आई होण्यासाठी बिपाशा उत्सुक असली तरी सुरुवातीचे काही महिने मात्र तिच्यासाठी कठीण होते. " सकाळी थकवा येतो याबद्दल लोक बोलत असतात मात्र मी तर पूर्ण दिवसच आजारी असायचे. पूर्ण दिवस एकतर मी पलंगावर असायचे नाही तर बाथरूम मध्ये. अशात माझी जेवायची इच्छाच नसायची. कमी जेवल्याने माझं वजन खूप कमी झालं होतं. काही महिन्यानंतर हे सर्व त्रास कमी झाल्याचं मला जाणवलं." असं बिपाशाने या मुलाखतीत सांगितलं.

तसंच बिपाशाने या मुलाखतीत गरोदरपणातली तिच्या डोहाळ्यांबद्दलही खुलासा केला. गरोदरपणातील सुरुवातीच्या काळात एखादा पदार्थ खाण्याची महिलांना तीव्र इच्छा होते मात्र तिच्या बाबतीत तसं घडलं नाही असं तिने यावेळी सांगितलं. ती म्हणाली "फक्त कधीतरी एखादा खारट पदार्थ खाण्याची इच्छा व्हायची. गोड पदार्थांकडे तर पहायची इच्छाही नव्हती. तसं माझ्यासाठी फार काही बदललं नव्हतं फक्त हे सगळं खूपच आव्हानात्मक होतं. "

हेही वाचा: 'तर आज मी देखील असते बॉलीवूड वाईफ..', चंकी पांडेचं नाव घेत एकताची हैराण करणारी पोस्ट

'अलोन' या सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान बिपाशा बासू आणि करण सिंग ग्रोवरची ओळख झाली. त्यानंतर ते एकमेकांना डेट करू लागले. तर 2015 सालामध्ये दोघेही विवाह बंधनात अडकले. लग्नानंतर जवळपास सात वर्षांनी बिपाशा आणि करण आई बाबा होणार आहेत.