Tanaaz Davoodi : बॉबीच्या तिसऱ्या लग्नात नाचणारी 'अ‍ॅनिमल' मधील 'तनाझ दाऊदी' आहे तरी कोण?

बॉक्स ऑफिसवर अॅनिमलनं प्रचंड कमाई केली आहे. आतापर्यत आठशे कोटींपर्यत या चित्रपटानं मजल मारली आहे.
Bobby Deol Animal Movie Dance Jamal Kadu Who is Tanaaz Davoodi viral
Bobby Deol Animal Movie Dance Jamal Kadu Who is Tanaaz Davoodi viral
Updated on

Bobby Deol Animal Movie Dance Jamal Kadu : अर्जुन रेड्डी, कबीर सिंग सारख्या चित्रपटांमधून आपलं वेगळेपण सिद्ध करणाऱ्या संदीप रेड्डी वांगाचा अॅनिमल प्रदर्शित झाला आणि त्यावरुन वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाल्याचे दिसून आले आहे. या सगळ्यात वेगळ्या प्रकारे प्रकाशझोतात आलेल्या बॉबी देओलनं तर प्रेक्षकांना, चाहत्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पाडले आहे.

बॉक्स ऑफिसवर अॅनिमलनं प्रचंड कमाई केली आहे. आतापर्यत आठशे कोटींपर्यत या चित्रपटानं मजल मारली आहे. लॉर्ड बॉबी असा सोशल मीडियावर ट्रेंडही सुरु झाला आहे. बॉबीनं रणबीरच्या भावाची भूमिका साकारली असून तो या चित्रपटामध्ये व्हिलनच्या रुपात आहे. काही मिनिटांच्या भूमिकेत बॉबीनं आपली वेगळीच छाप सोडली आहे.

या सगळ्यात बॉबीचं चित्रपटातील तिसरं लग्न आणि त्यानं केलेला जमाल कडू गाण्यावर केलेला डान्स हा ट्रेडिंगचा विषय आहे. त्यातील अभिनेत्री तनाझ दाऊदची चर्चा होत आहे. ती कोण आहे, ती काय करते, तिनं आतापर्यत कोणकोणत्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे याविषयी गुगलवर शोध घेतला जात आहे. ती कोण आहे हे आपण जाणून घेणार आहोत.

यापूर्वी याच चित्रपटातून तृप्ती डिमरीनं भूमिका साकारली होती. तिच्या त्या भूमिकेचं कौतुक झालं होतं. मराठमोळ्या उपेंद्र लिमयेच्या कॅमिओनं देखील पब्लिक खूश झालं. त्यांनी उपेंद्रच्या भूमिकेचं कौतुक करुन त्यावर कमेंट्चा वर्षाव केला होता. अशातच बॉबीच्या गाण्यात दिसलेल्या तनाझ दाऊदीचं कौतुक होत आहे.

डीएनएनं दिलेल्या माहितीनुसार, तनाझ दाऊदी ही मोठी सेलिब्रेटी आहे. २७ जुन १९९७ रोजी तनाझचा जन्म इराणमधील तेहरान मध्ये झाला आहे. ती मेहदी अलियारी यांची मुलगी आहे. तिचे वडील पत्रकार असून आईचं नाव मार्जन दायमंड असे आहे. २०१४ ते २०१७ च्या दरम्यान दावूदीनं फॅशन डिझायनिंगचे शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर तिनं काही काळ काही कंपन्यांमध्ये इंटर्नशिपही केली.

सुरुवातीच्या काळात ती दी अनिमती कॅम्पेनमध्ये सहभागी झाली होती. त्यानंतर तिनं बॉलीवूड डान्सर म्हणून आपल्या करिअरला सुरुवात केली. यापूर्वी तिनं जॉन अब्राहम, वरुण धवन, नोरा फतेही आणि सनी लिओनी यांच्यासोबत डान्स केला असून त्याचीही चर्चा झाली आहे.

काय आहे जमाल कडू...

१९५० साली प्रसिद्ध झालेल्या जमाल कडू गाण्याची भुरळ आता सगळ्यांना पडली आहे. हे मुळ पर्शियन भाषेतील गाणं आहे. आता हर्षवर्धन रामेश्वर यांनी ते आता वांगा रेड्डींच्या अॅनिमलमध्ये ते म्युझिक आणि चाल पुन्हा एकदा वापरली आहे. जी प्रेक्षकांना कमालीचे आवडले आहे.

अॅनिमलमध्ये रणबीर कपूरसोबतच रश्मिका मंदाना, बॉबी देओल, अनिल कपूर, तृप्ती डिमरी, चारु शंकर, सलोनी बत्रा, शक्ति कपूर, सिद्धांत कर्णिक, प्रेम चोप्रा आणि सुरेश ऑबेरॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com