'बोले चुडिंया' चा टिझर प्रदर्शित, नवाझुद्दिन दिसणार रोमॅन्टिक भूमिकेत

वृत्तसंस्था
गुरुवार, 26 सप्टेंबर 2019

नवाझुद्दीन सिद्धकी आणि तमन्ना भाटिया यांचा चित्रपट 'बोले चुडिंया' चा टिझर प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवस य़ा चित्रपटाची चर्चा सुरु होती आणि अखेर त्याचा टिझर प्रेक्षकांसमोर आला आहे.

मुंबई : नवाझुद्दीन सिद्धकी आणि तमन्ना भाटिया यांचा चित्रपट 'बोले चुडिंया' चा टिझर प्रदर्शित झाला आहे. अनेक दिवस य़ा चित्रपटाची चर्चा सुरु होती आणि अखेर त्याचा टिझर प्रेक्षकांसमोर आला आहे. नवाझुद्दिन आणि तमन्ना य़ांनी सोशल मीडियावर टिझर शेअर केला. 

नेटफ्लिस्कची बहुचर्चित वेब सिरिज 'सेक्रेड गेम्स' मध्ये नवाझुद्दिन दिसला होता. त्यानंतर आता 'बोले चुडिंया' मध्ये एका वेगळ्या भूमिकेत तो या चित्रपटामध्ये दिसणार आहे. त्याचा टिझर इन्स्टाग्रामवर शेअर करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, ' आता आपल्याला आयुष्यात कोणताही लफडा नकोय, फक्त रोमान्स आणि कुटुंब'. 

या चित्रपटामध्ये नवाझुद्दिन आणि तमन्नासोबत कबीर दुहन सिंह, राजपाल यादव हि मंडळीदेखील दिसणार आहेत. या सिनेमाची कथा बांगड्या विकणाऱ्या एका माणसाची आहे. जो काही काळानंतर स्वत: ची फॅक्टरी उभारतो. मात्र स्वत: चा बिझनेस करण्यासाठी तो गाण्याचा वापर करतो. विशेष म्हणजे या चित्रपटासाठी नवाझुद्दिनने एक रॅप सॉंगदेखील गायलं आहे. 

राजस्थानमध्ये चित्रपटाचं शुटिंग करण्यात आलं आहे. चित्रपटाचं दिग्दर्शन नवाझुद्दिनचा भाऊ शमस नवाब सिद्घिकी याने केलं आहे. तर, राजेश भाटिया आणि किरण झवेरी भाटिया यांनी निर्देशन केलं आहे. पहिल्यांदाच नवाझुद्दिन आणि तमन्ना ही जोडी पडद्यावर एकत्र काम करताना दिसणार आहे.      


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bole Chudiyan teaser out Nawazuddin Siddiqui in a romantic role