
झोपडपट्टीतील अशिक्षित व गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित 'झुंड' या हिंदी चित्रपटाचे नागपूरमध्ये शुटींग झाले होते.
मुंबई : 'सैराट' फेम दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा बहुप्रतिक्षित 'झुंड' या चित्रपटाचे पहिले पोस्टर बॉलिवूड शहेनशहा अमिताभ बच्चन यांनी शेअर केले आहे. या चित्रपटात अमिताभ प्रमुख भूमिकेत आहेत.
झोपडपट्टीतील अशिक्षित व गुन्हेगार प्रवृत्तीच्या मुलांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नवी ओळख मिळवून देणारे नागपूरचे फुटबॉल प्रशिक्षक प्रा. विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित 'झुंड' या हिंदी चित्रपटाचे नागपूरमध्ये शुटींग झाले होते. या चित्रपटात अमिताभ बच्चन फुटबॉल प्रशिक्षकाची मुख्य भूमिका साकारणार आहेत.
पहिलाच चित्रपट केला सैफसोबत, कोण आहे ही बॉलिवूडची हॉट न्यूकमर ?
मराठी चित्रपट आणि एकूणच चित्रपटसृष्टीचे आकर्षण ठरलेले नागराज मंजुळे यांचा 'झुंड' हा पहिला हिंदी चित्रपट आहे. अमिताभ बच्चन आणि नागराज मंजुळे हे दोन प्रतिभावंत कलाकार या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आले असल्यानं झुंडबद्दल लोकांच्या मनात उत्सुकता आहे. विजय बारसे यांच्या आयुष्यावर आधारित आहे. विजय यांनी झोपडपट्टीतील मुलांना प्रशिक्षण देत त्यांची फुटबॉल टीम बनवली. अमिताभ यांनी पहिले पोस्टर शेअर करताना म्हटले आहे, की झुंड चित्रपटाची पहिली झलक घेऊन येत आहे.