esakal | बापानं कोरोनाचं व्हॅक्सिन घेतलं, पोरगा खुशाल टिंगल करतोय

बोलून बातमी शोधा

bollywood actor anil kapoor recieve covid 19 vaccine second dose son harshvardhan
बापानं कोरोनाचं व्हॅक्सिन घेतलं, पोरगा खुशाल टिंगल करतोय
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये कोरोनानं मोठमोठ्या सेलिब्रेटींची झोप उडवली आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अशावेळी त्या सेलिब्रेटींनी घरातच क्वारंनटाईन होणं पसंद केले आहे. तर अनेकांना मालदीवचा रस्ता धरला आहे. तिथे समर व्हॅकेशन ट्रीपचा आनंद घेण्यावरही भर दिला जात आहे. वेगवेगळे सेलिब्रेटी सध्या मालदिवला जाऊन तिथल्या निसर्गाचा आनंद घेताना दिसत आहे. त्यांनी तेथील काही फोटोही सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. अशावेळी बॉलीवूडमधील कलाकार आपल्या चाहत्यांना कोरोनापासून दूर राहण्यासाठी घरात राहण्याचे आवाहन करत आहेत. दुसरीकडे आतापर्यत अनेक सेलिब्रेटींनी कोरोनाचे व्हॅक्सिन घेतले आहे.

बॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेते अनिल कपूर यांनी कोरोनाचे व्हॅक्सिन घेतले आहे. त्याची माहिती त्यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन दिली आहे. ज्यावेळी त्यांनी ती पोस्ट शेअर केली त्याच वेळी त्यांच्या मुलाने त्यांना कमेंट दिली आहे. वडिलांनी लस घेतल्यानंतर मुलाने त्यांना ते कोणत्या दिवशी लस घेणार होते याची आठवण करुन दिली आहे. ती पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांच्या चर्चेचा विषय ठरली आहे. अनिल कपूर यांच्या चाहत्यांनी त्या पोस्टला मोठ्या प्रमाणात लाईक करुन कमेंटही दिल्या आहेत. 64 वर्षांच्या अनिल कपूर यांचा फिटनेस पाहून आजही अनेकांना त्यांच्या वयाबाबत शंका वाटते. आपल्या फिटनेसकडे त्यांनी बारकाईनं लक्ष दिलं आहे.

अनिल कपूर यांनी कोरोना व्हॅक्सिन घेतानाचा फोटो शेअर केल्यानंतर त्यांना फॅन्सकडून वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत. अशावेळी अनिल कपूर यांचा मुलगा हर्षवर्धन कपूरनं वडिलांचा फोटो पाहून त्यावर एक गंमतीशीर कमेंटही दिली आहे. अनिल कपूर यांनी इस्टांवर व्हॅक्सिन घेतानाचा फोटो शेअर करुन त्याला एक कॅप्शनही दिली आहे. त्यात त्यांनी म्हटलं आहे की, मी आज कोरोनाचा दुसरा डोस घेतला आहे. यावेळी त्यांनी आपल्या चाहत्यांना घरात राहण्याचा सल्ला दिला आहे.

हर्षवर्धन कपूरच्या पोस्टनं अनिल कपूर यांची पोस्ट सर्वांच्या चर्चेचा विषय झाली आहे. त्यानं लिहिलं आहे की, तुम्ही लस कशी घेतली, वय वर्षे 45 च्या नंतरच्या लोकांना तर 1 मे नंतर व्हॅक्सिन दिले जाणार आहे. त्यानंतर अनिल यांच्या त्या पोस्टवर अनेकांनी कमेंटस केल्या आहेत. त्यांनीही हर्षवर्धनला उत्तर दिले आहे. त्यांनी लिहिलं आहे की, त्यांनी जर माझे आधार कार्ड पाहिले असते तर मला पुन्हा घरी पाठवले असते. आणि मला एक मे ला यायला सांगितले असते.