esakal | 'केसांबरोबर मेंदूही उडून गेलायं' नेटक-यांकडून अनुपम खेर ट्रोल

बोलून बातमी शोधा


bollywood actor anupam kher
'केसांबरोबर मेंदूही उडून गेलायं' नेटक-यांकडून अनुपम खेर ट्रोल
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - अभिनेता अनुपम खेर हे सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारे कलाकार आहेत. ते त्यांच्या परख़ड स्वभावाबद्दही प्रसिध्द आहेत. यापूर्वीही ते त्यांच्या वक्तव्यामुळे वादाच्या भोव-यात सापडल्याचे दिसून आले आहे. सध्या अनुपम खेर हे चर्चेत आले आहेत ते त्यांनी सरकारच्या बाजूनं वक्तव्य केल्यामुळे. त्यांनी जे व्टिट केले होते. त्यामुळे त्यांना लोकांनी मोठ्या प्रमाणावर ट्रोल केले आहे. इतकेच नव्हे तर अनेकांनी अनुपम यांना कंगणाचे मेल व्हर्जन असेही म्हटले आहे.

सध्या देशात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. देशातील अनेक राज्यांमध्ये कोरोनाची भयानक परिस्थिती आहे. अशावेळी काय करावे असा प्रश्न सर्वांसमोर आहे. काही ठिकाणी रुग्णालयात ऑक्सिजनची व्यवस्था नाही. बेड शिल्लक नाहीत. व्हॅक्सिनेशनचा तुटवडा जाणवत आहे. या परिस्थितीत खेर यांनी एक व्टिट केले आहे. त्यात त्यांनी लिहिलं आहे की, 60 च्या दशकामध्ये मी लहान असताना खुप संकटे पाहिली. त्यात तीन युध्दांचाही समावेश होता. खाण्याची कमीही होती. बेकारी होती. मात्र फाळणीनंतरचे सर्वात मोठे संकट आता आपल्यावर आले आहे. त्यावेळी सगळं काही गायब झालं होतं. कुठलेही कंट्रोल रुम नव्हते. परिस्थिती सर्वसामान्यांच्या हाताबाहेर गेली होती.

त्या व्टिटवर आणखी एक व्टिट त्यांनी केलं आहे. हे जरा जास्तच झालं आहे. सगळी काही सरकारची जबाबदारी आहे असं नाही तर त्यात आपलीही जबाबदारी आहे. त्यांना दोष देऊन काही फाय़दा नाही. आपण आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवायला हवी. ती सगळ्य़ांसाठी अतिशय महत्वाची आहे. घाबरण्याचे तर काहीच कारण नाही. कारण आयेगा तो मोदीही, जय हो. अशाप्रकारे त्यांनी आपले मत मांडले आहे. त्यामुळे त्यांना मोठ्या समस्येला सामोरं जावं लागलं आहे.

ज्यावेळी खेर यांनी अशाप्रकारचे व्टिट केले त्यानंतर त्यांना नेटक-यांनी ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकानं लिहिलं आहे की, तुम्ही तर काहीही बोलला आहात. सध्या सगळ्या जगावर कोरोनाचे सावट आहे. देव तुम्हाला चांगली बुध्दी देवो. केसांबरोबर मेंदूही कामातून गेला आहे. अशाप्रकारच्या कडवट प्रतिक्रिया लोकांनी खेर यांना दिल्या आहेत.