ऐकावं ते नवलच! भांडण झाली कुत्र्यांची अन् घटस्फोट झाला पती पत्नीचा

सुस्मिता वडतिले 
Tuesday, 15 September 2020

बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंहने पत्नी ली एल्टनला कुत्र्याच्या भांडणावरून घटस्फोट दिला आहे

पुणे : आपण आतापर्यंत नवरा बायकोचे भांडण झालेलं ऐकले असतील. त्यांच्या दोघांमध्ये काही गोष्टींवरून विचार न जुळणे, काही कारणांमुळे न पटणे आणि वाद-भांडणे होणे. या काही कारणांमुळे घटस्फोट झालेले ऐकले असेलच, बरोबर ना. या काही कारणामुळे बॉलिवूड सेलिब्रिटींचाही घटस्फोट झालेला आहे. परंतु तुम्ही असं कधी ऐकलंय का? कुत्र्याच्या भांडणावरून माणसांचा घटस्फोट होतो ते ? हो जे ऐकलं ते खरं आहे. बॉलिवूड अभिनेता अरुणोदय सिंहने याच कारणामुळे आपल्या पत्नीला घटस्फोट दिला आहे. अरुणोदय मध्य प्रदेशमधील काँग्रेस नेते अजय सिंह यांचा सुपूत्र आहे.

अरुणोदय सिंह आणि त्याची पत्नी कॅनडाची ली एल्टन यांचं नोव्हेंबर 2016 मध्ये लग्न झालं आहे. भोपाळमधील विशेष विवाह कायद्याअंतर्गत त्यांनी लग्न केलं आहे. काही दिवसांमध्येच या दोघांमध्येसुद्धा वाद सुरु झाले. लग्न झाल्यापासून तीन वर्षांच्या आतमध्येच त्यांच्यावर घटस्फोटाची वेळ आली. सूत्रांच्या माहितीनुसार या दोघांच्या वादाची सुरुवात कुत्र्यांच्या भांडणापासून झाली आहे. ली एल्टन आणि अरुणोदय या दोघांच्याही कुत्र्यांची आपसात लढाई झाली आणि त्यानंतर दोघांमध्येही वाद वाढत गेले आहे. तसेच अरुणोदयने एल्टनवर अनेक गंभीर आरोपही लावले होते. यामुळे त्यांच्यामधील वाद वाढतच गेले आहे. 

अरुणोदय सिंहने 2019 मध्ये कॅनडामध्ये ये-जा करणे सुद्धा बंद केलं होतं. त्यानंतर 10 मे 2019 रोजी भोपालच्या फॅमिली कोर्टात ली एल्टनविरोधात घटस्फोटासाठी अर्ज केला आहे. एल्टन त्या दिवसात कॅनडामध्ये होती. तिनेसुद्धा अरुणोदयविरोधात मुंबईत केस दाखल केली. तसेच 18 डिसेंबर 2019 मध्ये ली एल्टनला काहीही माहिती न देता भोपाळ कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटाचे आदेश दिले आहे.

अरुणोदय सिंहने याने आपल्याला एकतर्फी घटस्फोट दिला आहे, असे म्हणत पत्नी ली एल्टनने जबलपूर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरुणोदय याने घटस्फोटाबाबत पत्नीला काहीच माहिती दिली नव्हती आणि एकतर्फी घटस्फोट घेतला आहे. त्यामुळे भोपाळ न्यायालयाचा आदेश रद्द करावा, अशी मागणी ली एल्टनने याचिकेत केली आहे. जबलपूर उच्च न्यायालयात या याचिकेवर सुनावणी झाली असून याबाबत भोपाळ कौटुंबिक न्यायालयातील नोंदी  मागवण्यात आलेल्या आहेत. यांची सहा ऑक्टोबरला पुढील सुनावणी होणार आहे. पुढे काय होईल हे सुनावणी नंतर समजणार आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood actor Arunodaya Singh has divorced his wife Lee Elton over a dog fight