esakal | आर्यनच्या वकीलांनी दिला रियाच्या निकालाचा दाखला, म्हणाले...
sakal

बोलून बातमी शोधा

आर्यनच्या वकीलांनी दिला रियाच्या निकालाचा दाखला, म्हणाले...

आर्यनच्या वकीलांनी दिला रियाच्या निकालाचा दाखला, म्हणाले...

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - आर्यन खानला सात ऑक्टोबर पर्यत एनसीबीच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. याप्रकरणी आर्यनचे वकील सतीश मानशिंदे यांनी जो कोर्टात युक्तिवाद केला त्याची चर्चा सुरु झाली आहे. त्यांनी न्यायालयाचं लक्ष काही जुन्या मुद्दयांकडे वेधले. त्या मुद्दयांच्या आधारे त्यांनी काही प्रश्नही यावेळी उपस्थित केले. त्यात त्यांनी अभिनेत्री रिया चक्रवतीच्या वेळेस न्यायालयानं दिलेल्या आदेशाचा उल्लेख केला. त्यात रियाच्या केसमध्ये न्यायालयानं जामीनाचा निर्णय घेतला आणि तिच्या कोठडीला नकार दिला. या केसमध्ये देखील आपल्या अशिलाकडून काहीही जप्त करण्यात आलेलं नाही. त्यामुळे त्याच्या कोठडीची मागणी याला काही पुरावा दिसत नाही. असं मानशिंदे यांनी म्हटलं आहे.

मानशिंदे यांनी असं म्हटलंय की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार व्हॉट्सअप चॅट आरोप सिद्ध करण्यासाठी वापरता येत नाहीत. एनडीपीएस कायद्यान्वये जामीन आणि अजामीन काय यावर युक्तीवाद केला. सर्वोच्च न्यायालयानं अजामीनपात्र गुन्ह्यासाठी जामीन दिल्याचंही त्यांनी न्यायालयात सांगितलं. याप्रमाणे या न्यायालयाला देखील अजामीनपात्र गुन्ह्यात जामीन देण्याचा अधिकार आहे. त्यामुळे या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. पोलिसांनी आर्यन खानच्या बाबत जो तपास केला. त्यातून त्यांच्या हाती काही लागलेलं नाही. त्यामुळे जे काही सांगितलं जातयं त्याला अर्थ नसल्याचेही मानशिंदे यांनी म्हटलंय.

बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला (Shah Rukh Khan) एनसीबीनं कोर्टामध्ये हजर केलं होतं. यावेळी वेगवेगळ्या गोष्टींवर धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्यन खानच्या वकिलांनी त्याला जामीन मिळावा म्हणून मागणी केली होती. मात्र पोलिसांनी केलेल्या पुराव्यांमुळे त्याला न्यायालयानं जामीन नाकारला आहे. आता आर्यनला ७ ऑक्टोबरपर्यत एनसीबीच्या कोठडीत राहावं लागणार आहे.

हेही वाचा: Drugs case: आर्यन खानच्या सेल्फीमधील 'तो' मिस्ट्री मॅन कोण?

हेही वाचा: ड्रग्जविषयी आर्यन कोडवर्डमधून बोलायचा, काय होता कोर्टातील युक्तिवाद

loading image
go to top