Ashwin Mushran: 'शाकाहार' करणारे आनंदानं 'माणूसकीची हत्या करतातच की!

भारतामध्ये कधी कोणत्या गोष्टीवरुन वादाला सुरुवात होईल हे (Bollywood News) काही सांगता येत नाही.
Ashwin Mushran
Ashwin Mushran esakal
Updated on

Halal Row: भारतामध्ये कधी कोणत्या गोष्टीवरुन वादाला सुरुवात होईल हे (Bollywood News) काही सांगता येत नाही. कर्नाटकामध्ये हिजाबवरुन वाद (Hijab Row) पेटला होता. त्यावेळी विद्यार्थीनींना हिजाब परिधान करुन शाळांमध्ये येता येणार नाही. असा निर्णय कर्नाटक सरकारनं घेतला होता. त्याचे तीव्र (Entertinment News) पडसादही सोशल मीडियावरुन उमटल्याचे दिसून आले. तो वाद अजुनही सुरुच आहे. सध्या हे प्रकरण कोर्टाच्या अखत्यारित असून त्यावर सुनावणी बाकी आहे. त्यातच पुन्हा एकदा हलाल आणि झटका या प्रकरणानं देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर बॉलीवूडमधील वेगवेगळ्या सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात अभिनेता अश्विन मुशर्म यानं दिलेल्या प्रतिक्रियेनं पुन्हा या प्रकरणाकडे लक्ष वेधले गेले आहे.

अश्विननं ट्विटवरुन हलाल प्रकरणावर एक मार्मिक प्रतिक्रिया दिली आहे. मांसाहार करणाऱ्यांकडून वाईटपणा प्रत्ययाला येतो असे नाही. तर शाकाहारी असणाऱ्यांकडून मानवता पायदळी तुडवली गेली आहे. असं अश्विननं म्हटलं आहे. तो नेहमीच त्याच्या तिरकसपणासाठी ओळखला जातो. कमी शब्दांत प्रभावी भाष्य करणाऱ्या अश्विनला सोशल मीडियावर फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. त्यानं आता जे व्टिट केलं आहे त्याला हजार लोकांनी रिट्विट केलं आहे. त्यामुळे दरवेळी देशातील ज्या गंभीर घटना समोर येतात त्यावर अश्विन काय म्हणतो हे पाहण्यासाठी, त्याला ऐकण्यासाठी आणि त्यानं जे काही लिहिलं आहे ते वाचण्यासाठी त्याचे चाहते त्याला फॉलो करत असतात.

Ashwin Mushran
Photo Viral: 'शहनाज' आली, चाहत्यांच्या आनंदाला उधाण! विमानतळावर गर्दी

यापूर्वी बॉलीवूडच्या एका मोठ्या गायकानं हलाल प्रकरणावर प्रतिक्रिया दिली होती. त्या गायकाचे नाव लकी अली. त्यानं सध्या ज्या गोष्टीवरुन वाद सुरु आहे त्यावर नाराजी व्यक्त करत हलाल हे काही सर्वच धर्माच्या लोकांसाठी नसुन ते मुस्लिमांमधील निवडक समुहासाठी आहे. असे मत लकी अलीनं व्यक्त केलं होतं. हिजाब' वादानंतर आता कर्नाटकमध्ये 'हलाल' मटणावरुन वाद सुरु आहे. या प्रकरणात बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या शिवमोगा जिल्ह्यात ही घटना घडली होती. बजरंग दलाचे कार्यकर्ते मटणाच्या दुकानात जाऊन 'हलाल' न केलेल्या मटणासंबंधी विचारणा करत होते. एका मटणविक्रेत्याने असं मटण उपलब्ध नसल्याचं सांगताच त्याला या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. तसेच ह्याच कार्यकर्त्यांनी एका हॉटेलमध्ये हलाल नसलेल्या मटणाच्या डिशची मागणी केली होती. ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com