प्रसिध्द अभिनेता बोमन इराणी यांना मातृशोक

बोमन (boman written in post) यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,
boman irani passed
boman irani passed Team esakal

मुंबई - बॉलीवूडचे प्रसिध्द अभिनेता बोमन इराणी (bollywood actor) यांच्या आईचं (mother passed away) वार्धक्यानं निधन झालं आहे. त्या 94 वर्षांच्या होत्या. बोमन यांनी सोशल मीडियावरुन ही माहिती दिली आहे. त्यांच्या या पोस्टवर बॉलीवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी प्रतिक्रिया देऊन आईंना श्रध्दांजली वाहिली आहे. आपल्या आगळ्या वेगळ्या अभिनयामुळे बोमन यांनी बॉलीवूडमध्ये ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या या प्रवासामागे त्यांच्या आई हे त्यांचे प्रेरणास्थान होते. यापूर्वीच्या अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला होता. (bollywood actor boman irani mother passed away)

बोमन (boman written in post) यांनी त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे की, आई ईरानीनं झोपेतच अखेरचा श्वास घेतला. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो, तिनं वयाच्या 32 व्या वर्षांपासून दोन भूमिका आपल्या आयुष्यात केल्या. ती अतिशय उत्साही होती. आनंदी आणि हसमुख होती. ती माझ्यासाठी प्रेरणास्थानही होती. तिचं आयुष्य हे वेगवेगळ्या अनुभवानं समृध्द झालं होतं. ते माझ्य़ासाठी खूप मार्गदर्शक ठरलं.

बोमन यांनी लिहिले आहे, जेव्हा ती मला एखाद्या चित्रपटामध्ये काम करायला सांगत असे तेव्हा अनेक गोष्टींचा सल्ला देत असे. ती नेहमी म्हणायची पॉपकॉर्न आणायला विसरु नकोस. तिला गाणी फार आवडायची. याशिवाय एखाद्या गोष्टीबाबत तिला काही शंका असेल तर ती त्याच्याबद्दलची माहिती विकीपिडीया आणि आयएमडीबीवर चेक करायची.

boman irani passed
'बाबा रामदेव म्हणजे कोरोना व्हायरस, कधीही येतो, कधीही जातो'
boman irani passed
'5 जी च्या विरोधात नाही, आम्हाला फक्त सेफ्टी सर्टिफिकेट द्यावं' ....

आई मला नेहमी सांगायची, लोकं तुझं कौतूक करतात म्हणून तु अभिनेता नाहीस. लोकांना आनंद देणं त्यासाठी अभिनय करणं ही अभिनेत्याची व्याख्या आहे. नेहमी लोकांना आनंद दे. शेवटच्या रात्री तिनं मलाई कुल्फी आणि आंबे खायला मागितले होते. माझ्यासाठी एक स्टार होती. आणि स्टार राहिल. गेल्या वर्षीही बोमन यांनी आईच्या जन्मदिनी 18 नोव्हेंबरला एक पोस्ट केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com