esakal | अलवियाच्या फोटोनं वाढलं टेम्परेचर, सॉलिड लूकनं चाहते घायाळ

बोलून बातमी शोधा

bollywood actor jaaved jaaferi daughter alaviaa jaaferi hot bold photoshoot
अलवियाच्या फोटोनं वाढलं टेम्परेचर, सॉलिड लूकनं चाहते घायाळ
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोना जरी असला तरी अनेक सेलिब्रेटी सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यानिमित्तानं आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असल्याचे दिसून आले आहे. सुरुवातीला काही जणांनी चाहत्यांना कोरोनाच्या निमित्तानं काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. घराबाहेर पडू नका. जेव्हा अत्यावश्यक कुठले कारण असेल त्याचवेळी बाहेर जा. आपल्यामुळे कोरोनाचा प्रचार प्रसार होणार नाही याची काळजी घ्या. अशा प्रकारच्या सुचनावजा आवाहन सेलिब्रेटी आपल्या चाहत्यांना करत आहे. अशावेळी काही सेलिब्रेटीं फोटोशुटच्या माध्यमातून प्रेक्षकांची पसंती मिळवताना दिसत आहे.

प्रख्यात अभिनेते आणि डान्सर जावेद जाफ्री याची मुलगी अलविया जाफरीनचं सध्या सोशल मीडियावर कौतुक सुरू आहे. यापूर्वी जावेद अख्तरचा मुलगा मीझाननं संजय लीला भन्साळी यांच्या मलाल चित्रपटातून बॉलीवूडमध्ये इंट्री केली होती. त्या चित्रपटाला फारसा प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला नव्हता. दोघेही कलाकार नवीनच होते. मात्र चित्रपटाचे कथानक फारसे प्रभावी नव्हते. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर आदळला होता. अलविया सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी कलाकार आहे. तिच्या सिजलिंग फोटोंना चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यांनी दिलेल्या कमेंट्समुळे अलवियाचा उत्साह वाढला होता.

अलवियाला सोशल मीडियावर फॅन फॉलोर्सही मोठ्या प्रमाणात आहे. तिच्या फोटोंना तिला व्हायरल करण्याची गरज पडत नाही. तिनं फोटो सोशल मीडियावर पोस्ट करण्याचा अवकाश ते व्हायरल झालेले असतात. एवढी तिची लोकप्रियता आहे. अलवियाला फॅशन डिझायनिंगची आवड आहे. ती या विषयाचे न्युयॉर्कमध्ये शिक्षण घेत आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या अलवियाकडे बॉलीवूड डेब्युच्या अनेक ऑफर्स आहेत. मात्र चित्रपटात येण्याविषयी तिनं काही विचार केलेला नाहीये.

अलवियाला सध्या आपल्या अभ्यासाकडे लक्ष द्यायचे आहे. ती फॅशन डिझायनिंगच्या तिस-या वर्षाला आहे. अलविया आणि श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर या चांगल्या मैत्रिणी आहेत. अलवियाचे वडिलच नाहीत तर तिचे आजोबा जगदीप हे देखील प्रख्यात अभिनेते होते.