esakal | बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक

बोलून बातमी शोधा

Bollywood actor arrest cause of break the chain

बॉलिवूडच्या लोकप्रिय अभिनेत्याला पोलिसांनी केली अटक

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. सर्वसामान्य व्यक्तींपासुन केंद्र सरकारचे धाबे कोरोनानं दणादणालं आहे. कोरोनाचा सामना कसा करावा असा प्रश्न आता प्रत्येकाला पडला आहे. अद्याप प्रभावी लस या आजारावर सापडलेली नाही. ज्या लशी तयार झाल्या आहेत त्या योग्य त्या प्रमाणात उपलब्ध होत नसल्यानं सर्वांची डोकेदुखी वाढली आहे. गेल्या महिनाभरापासून कोरोनाशी दोन हात करण्यासाठी वेगवेगळ्या राज्यांनी लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यात अनेक नागरिकांवर अनेक निर्बंध घालण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळी संचारबंदीची घोषणा करण्यात आली आहे.बॉलीवूडमधील प्रसिध्द अभिनेता जिमी शेरगील आता भलताच चर्चेत आला आहे. त्याला कारणही तसेच आहे.

रात्रीच्या वेळी संचारबंदी असतानाही त्यानं शुटिंग केल्यानं लुधियाना पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याविरोधात संचारबंदीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे जिमीच्या चाहत्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. कोरोनाच्या काळात एका रात्री तो शुटिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याचे गेल्या काही दिवसांपासून एका पंजाबी वेबसीरिजचे चित्रिकरण सुरु होते. लुधियानातील एका शाळेत गेल्या तीन दिवसांपासून शुटिंग सुरु होते.

केवळ जिमी शेरगीलच नाही तर त्याच्यासहित आणखी चार जणांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्या मालिकेचे दिग्दर्शक इश्वर निवास आणि 35 जणांनाही मंगळवारी रात्री लुधियाना पोलिसांनी अटक केली आहे. या सर्वांनी कोविड 19 च्या नियमांचे उल्लंघन केले होते. गेल्या तीन दिवसांपासून एका पंजाबी मालिकेची शुटिंग आर्य शाळेत सुरु होती. त्या शाळेत सेशन कोर्टाचा सेट तयार करण्यात आला होता. त्या जागी शुटिंग करणा-यांनी मास्क घातले नसल्याचे दिसून आले होते. जिमीच्या व्यतिरिक्त आणखी तिघेजण मुंबईचे आहेत.

img

actor jimmi shergil