चित्रपट चालण्यासाठी वाद तयार करायला सांगितला जातो, नवाझुद्दीनचा धक्कादायक खुलासा|Bollywood Actor Nawazuddin Siddiqui | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bollywood Actor Nawazuddin Siddiqui

चित्रपट हिट होण्यासाठी मुद्दाम वाद घडवला जातो, नवाझुद्दीनचा धक्कादायक खुलासा

Bollywood News: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाझुद्दीन सिद्धिकी हा त्याच्या अभिनयासाठी ओळखला जाणारा अभिनेता आहे. त्याचा बाकीच्या (Bollywood Actor) काँट्रोव्हर्सीसाठीही ओळखला जातो. मात्र इतर अभिनेत्यांसारखा तो प्रसिद्धीच्या झोतात वावरणारा अभिनेता नाही. त्याचा खास चाहतावर्ग आहे. (Nawazuddin Siddiqui) त्याच्या चित्रपटांना मिळणारा प्रेक्षकवर्ग आहे. आज त्याचा वाढदिवस आहे. त्यानिमित्तानं आपण त्याच्याविषयीच्या वेगवेगळ्या आठवणींना (Social media viral news) उजाळा देणार आहोत. नवाझुद्दीन हा जसा त्याच्या अभिनयामुळे प्रसिद्ध आहे तसा तो त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियेमुळेही ओळखला जातो. एका न्युजचॅनेलला त्यानं दिलेल्या मुलाखतीमध्ये बॉलीवूड चित्रपटांमध्ये जे वाद होतात त्याच्यामागील खरं कारण सांगितलं आहे.

नवाझुद्दीन सध्या कान्स चित्रपट महोत्सवामध्ये व्यस्त आहे. त्या जगप्रसिद्ध महोत्सवामध्ये त्याच्या एका चित्रपटाचे स्क्रिनिंग आहे. नवाझुद्दीनचे कान्समधील वेगवेगळे फोटो व्हायरल झाले आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद दिला आहे. त्याच्या जन्मदिनाच्या निमित्तानं एक मुलाखत व्हायरल झाली आहे. त्यामध्ये नवाझुद्दीनला तो हल्ली बॉलीवूडच्या पार्ट्यांमध्ये का दिसत नाही, असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर तो म्हणाला, मला वेगवेगळ्या पार्ट्यांमध्ये निमंत्रण असते. मात्र मी हल्ली त्याला जाण बंद केलं आहे. बॉलीवूडमध्ये एखादा नवा चित्रपट आल्यास त्यापूर्वी काही वाद पुढे येतात. त्याच्या कथेशी संबंधित, नावावरुन किंवा अभिनेत्री - अभिनेत्याच्या मानधनावरुन यावरुन नवाझुद्दीनला विचारण्यात आल्यानंतर त्यानं आपल्यालाही अनेकदा वाद तयार करण्यासंबंधी सांगण्यात आले होते. मात्र आपण या गोष्टीला विरोध केला होता.

जेव्हा एखादा नवीन चित्रपट प्रदर्शित होतो तेव्हा तो चालण्यासाठी, किमान चर्चेत येण्यासाठी त्यावरुन वाद तयार केला जातो. मलाही अनेकदा माझ्या चित्रपटांवरुन अशा प्रकारचे वाद क्रिएट करण्यास सांगितले होते. पण मी याला नकार दिला. यावर माझी काही ठाम विचारधारा आहे. जर तुमचा अभिनय, कथा सशक्त असेल तर तुम्हाला कुणालाही घाबरण्याचे काहीही कारण नाही. मात्र आपल्याकडे परिस्थिती उलट आहे. त्यामुळे हल्ली कोणताही चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी त्याच्यावरुन वाद निर्माण करण्याचा ट्रेंड सुरु झाला आहे.

लोकांचे लक्ष वेधुन घेण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा मीडियातून आपल्यासमोर येत असतात. मात्र त्यातील सत्यता हा संशोधनाचा विषय आहे. काहीही होत नसतं. ते उगाच लोकांना चित्रपट पाहण्यासाठी त्यांची उत्सुकता आणखी वाढविण्यासाठी अशा प्रकारच्या गोष्टी कराव्या लागतात. असेही नवाझुद्दीननं यावेळी सांगितले.