Ved Teaser: रितेशचा 'वेड' तेलगू चित्रपटाची कॉपी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ved Teaser
Riteish Deshmukh 
Genelia Deshmukh

Ved Teaser: रितेशचा 'वेड' तेलगू चित्रपटाची कॉपी...

Actor Riteish Deshmukh ved movie teaser out is copy of telagu movie: अभिनेता रितेश देशमुख आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख हे सध्या त्याच्या वेड या चित्रपटामूळे चर्चेत आहे. काही दिवसांपुर्वीच या चित्रपटाचं टिझर रिलिज झालं आहे. रितेशने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर 'वेड'चा टीझर शेअर केला आहे. त्याच्या टिझरला चाहत्यांचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

रितेश देशमुख दिग्दर्शित आणि अभिनित चित्रपटाचा टिझर प्रदर्शित झालाय. मात्र त्याचा हा चित्रपट तेलगू चित्रपट 'मंजिली'चा रिमेक आहे. या मूळ चित्रपटात नागा चैतन्य आणि सामंथा हे कलाकार प्रमुख भूमिकेत होते. सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांच्या चित्रपटातील दृष्य आणि वेडचा परिसर आणि दृश्यांमधील साम्य दर्शविण्याबरोबरच चाहत्यांनी टीझरचे कौतुक केले आहे .

टिझर पाहिल्यानंतर एका चाहत्याने विचारले, "हा मजिंलीचा रिमेक आहे का?" दुसर्‍याने लिहिले, “हा चित्रपट जरी मजिलीचा रिमेक असला तरी तो हिट होईल कारण लोकांना काय करावे लागेल. या जोडप्याला गंभीर भूमिकेत पहा”

हेही वाचा: काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली??

हेही वाचा: Ved Teaser: ‘दिग्दर्शनातलं पहिलं पाऊल....मनात थोडी आतुरता..थोडी भीती’ ‘वेड’ लावयला येतोय रितेश…

तर 'वेड' चित्रपट 'मंजिली' या तेलगू चित्रपटाचा रिमेक आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखने त्याच्या 'वेड' चित्रपटाविषयी माहिती दिली होती. त्याच बरोबर त्यांने चित्रपटाचा फर्स्ट लुकही शेअर करत काही फोटोही सोशल मीडियावर शेअर केले होते. चित्रपटात जेनेलिया डिसूजा एका साध्या लूकमध्ये दिसत आहे. रितेश देशमुख आणि जेनेलिया डिसूझा 10 वर्षांनंतर मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत तर या चित्रपटाद्वारे या चित्रपटाद्वारे अभिनेत्री जेनेलिया डिसूझा मराठी चित्रपटात पदार्पण करणार आहे. हा चित्रपट 30 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.