सलमान देवदूत बनून पोहोचला होता दियाच्या घरी

diya mirza
diya mirza
Updated on

मुंबई - हिंदी चित्रपटसृष्टीमधील प्रसिध्द अभिनेत्री दिया मिर्झा 15 फेब्रुवारी रोजी वैभव रेखी सोबत लग्नाच्या बंधनात अडकली. त्यानंतर ती पुन्हा चर्चेत आली. वैभव बिझनेसमैन आहे. दिया आणि वैभवच्या लग्नात महिला पुजारीने असल्याने हा विवाह सोहळा चर्चेत होता. दियाच्या या विवाह सोहळ्याचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाले. या सोहळ्यात कन्यादान आणि वधूची पाठवणी हे लग्न विधी झाले नाहीत. तसेच या लग्नातील सजावट देखील पर्यावरण पुरक (इको फ्रेंण्डली) होती. लग्नाचे फोटो पोस्ट करून दियाने कॅप्शनमध्ये लिहीले की,' प्रेम हे संपूर्ण चक्र आहे. माझे कुटुंम्ब वाढत आहे. देवाच्या प्रत्येक तुकड्याला त्याचा पुर्ण तुकडा मिळतोच.' लग्नाला दोन महिने पुर्ण झाल्यानंतर नुकतीच दियाने तिच्या प्रेग्नेंसीची घोषणा केली आहे. नुकतीच दिया मालदीवला हॉलिडे सेलिब्रेट करण्यासाठी गेली होती.      

दरम्यान, आता 2015 मधलं दियाचं ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. दियाने 6 मे 2015 रोजी ट्विट केले होते की, ' त्या माणसाने माझ्या आईचे प्राण वाचवले आहेत. ते मी कधीच विसरू शकणार नाही.  #SalmanKhan'.दियाचे बॉलिवूडमध्ये अनेक मित्रमैत्रिणी आहेत. पण बॉलिवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खानसोबत दियाची खास मैत्री आहे. सलमानने अनेक सेलिब्रेटींना मदत केली आहे.

दियाची आई अचानक चक्कर येऊन पडली होती. आईची अचानक बिघडलेली प्रकृती पाहून दियाने सलमानला फोन केला. त्यानंतर लगेच सलमानने तिच्या घरी जाऊन आईला हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले. तेव्हा डॉक्टरने सांगितले होते की, दियाच्या आईला हॉस्पिटलमध्ये आणायला 15 मिनीट जरी उशिर झाला असता. तर तिचा जीव वाचवणे अवघड झाले असते.   

एका मुलाखतीत देखील ही आठवण दियाने सांगितली होती. याआधी सलमानने अनेक सेलिब्रेटींना आणि सामान्य नागरिकांना मदत केली आहे. कपिल शर्मा , सरोज खान आणि राखी सावंतची आई यांना सलमानने मदत केली आहे.
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com