बॉलीवूड अभिनेता संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाचे निदान

संतोष भिंगार्डे
Tuesday, 11 August 2020

आज संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत मी कामापासून काही काळ ब्रेक घेणार आहे. लवकरच परत येईन.' असं लिहिले होते.

मुंबई : बॉलिवूड अभिनेता संजय दत्तला कर्करोग झाल्याची बातमी समोर येत आहे. शनिवारी श्वास घ्यायला त्रास होत असल्यामुळे संजय दत्तला लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली होती. त्यानंतर सोमवारी त्याला घरी सोडण्यात आले. 

आज संजय दत्तने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकत मी कामापासून काही काळ ब्रेक घेणार आहे. लवकरच परत येईन.' असं लिहिले होते. त्यानंतर त्याच्या प्रकृतीबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले होते.

अभिनेता संजय दत्त याला स्टेज 3 चा फुफ्फुसाचा कर्करोग झाला आहे, संजय दत्तच्या गंभीर आजाराची माहिती समजताच अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, सलमान खानसह अन्य कलाकारांनी त्याला फोन केले आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. अधिक उपचारासाठी तो अमेरिकेत जाणार आहे. कोमल नाहटा यांनी त्याबाबत ट्विटही केले आहे.
----
संपादन : ऋषिराज तायडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood actor sanjay dutt detected with lungs cancer