esakal | आर्यन खानचा मुक्काम बुधवारपर्यंत न्यायालयीन कोठडीतच!
sakal

बोलून बातमी शोधा

आर्यन खानचा मुक्काम बुधवारपर्यंत न्यायालयीन कोठडीतच!

आर्यन खानचा मुक्काम बुधवारपर्यंत न्यायालयीन कोठडीतच!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - गोवा - मुंबई कॉर्टेलिया क्रुझवर एनसीबीनं छापा टाकून कारवाई केली. त्यात त्यांनी बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाला आर्यन खानला अटक केली. त्याच्यासहित आणखी काही जणांनाही अटक करण्यात आली होती. मात्र बॉलीवूडच्या स्टार अभिनेत्याच्या मुलाला अटक करण्यात आल्यानं या प्रकरणाला वेगळा रंग चढला आहे. गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची दिशा बदलल्याचेही दिसून आले आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीमध्ये आर्यनला जामीन मिळाला नव्हता. आजच्या सुनावणीमध्येही त्याच्या पदरी निराशा आली असून आता य़ाप्रकरणाची सुनावणी बुधवारी होणार आहे. त्यामुळे आर्यन खानला अद्याप दिलासा मिळालेला नाही.

आर्यन खानचे वकील सतीश मानशिंदे यांनी यापूर्वी आपल्याला या कोर्टात जामीन न मिळाल्यास उच्च न्यायालयात जाणार असल्याचे सांगितले आहे. आज झालेल्या सुनावणीतून काही मुद्दे समोर आले आहेत. त्यापैकी वेळ मिळाल्यास दोन्ही आरोपींचे वकिल अर्जंट सुनावनीची मागणी करणार आहेत. याअगोदर सेशन कोर्टात जामीनासाठी शुक्रवारी अर्ज केला होता. तो न्यायालयाने फेटाळला. आर्यनच्या वकिलांनी हा अर्ज आँनलाईन केला होता. या प्रकरणात आतापर्यंत २० जणांना अटक झालेली आहे.

मानशिंदे यांनी केलेल्या युक्तिवादात, जामीन हा काही तपास थांबवू शकत नाही. माझ्या अशिलाला न्यायालयीन कोठडी झालेली आहे. या गुन्ह्यात रिकव्हरीही झालेली आहे. मी आज ज्या व्यक्तीबाबत जामीनाची मागणी करतोय. ज्याच्याकडे काही सापडलं नाही आणि एनसीबीने काही रिक्वरीही केली नाही. या गुन्ह्याचा तपास सुरू आहे. सात दिवस कस्टडी झालेली आहे. संबधित व्यक्तीकडे काहीही मिळालेलं नाही. म्हणून मी कोर्टाला विनंती करतोय की त्यांनी जामीन द्यावा. म्हटलं आहे. दुसरीकडे आर्यन खान हा न्यायालयीन कोठडीत आहे. त्याला जर सोडलं तर तपासात अडथळे निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे एनसीबीनं म्हटलं आहे. याप्रकरणाची सुनावणी 13 ऑक्टोबरला होणार आहे.

हेही वाचा: Mumbai : आर्यन खान प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावी अडचणीत

हेही वाचा: "खान आडनावामुळे आर्यन पीडित अन् सुशांत हिंदू असल्यामुळे व्यसनाधीन?"

loading image
go to top