esakal | विक्की झालायं 'सरदार उधम', कसला दिसतोयं!
sakal

बोलून बातमी शोधा

विक्की झालायं 'सरदार उधम', कसला दिसतोयं!

विक्की झालायं 'सरदार उधम', कसला दिसतोयं!

sakal_logo
By
युगंधर ताजणे

विक्कीची सध्या बॉलीवूडमध्ये हवा आहे. त्याचे वेगवेगळे बिग बजेट चित्रपट प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहेत. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अभिनयानं त्यानं सर्वांची मनं जिंकून घेतली आहेत. त्याचा उरी द सर्जिकल स्ट्राईक जेव्हा पडद्यावर आला तेव्हा तो प्रचंड लोकप्रिय झाला. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. सध्या बॉलीवूडमध्ये आघाडीचा अभिनेता म्हणूनही तो ओळखला जातो. गेल्या काही दिवसांपासून चाहते त्याच्या नव्या चित्रपटाची वाट पाहत आहे. आता विक्की कौशलनं आपल्या आगामी अमेझॉन प्राईम व्हिडीओचा ओरिजिनल चित्रपट 'सरदार उधम'मधील एक असा लुक पोस्ट केला आहे, ज्यामध्ये त्याला ओळखणे कठीण आहे.

सरदार उधम यांची अनेक टोपणनावे होती आणि त्यांनी आपल्या मिशनसाठी वेगवेगळी ओळख धारण केली होती? त्यांचा हा लुक 1931च्या काळातील आहे, जेव्हा उधम सिंह प्रतिबंधित कागदपत्र 'ग़दर-ए-गंज' ('विद्रोहाचा आवाज') हाताळण्याचा आरोपाखाली जेलमध्ये होते. त्यांना सोडण्यात आले असले तरी ते नजरकैदेत होते. त्यानंतर लवकरच त्यांनी यूरोपात पलायन केले आणि मग ते कधीच परतून भारतात आले नाहीत. आता, सगळ्यांच्या नजरा चित्रपटातील विक्कीच्या इतर लुक्सवर खिळल्या आहेत. 'सरदार उधम' या दसऱ्याला 16 ऑक्टोबर रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रदर्शित होणार आहे. तो आता लवकरच सरदार उधम दिसणार आहे. त्यात विकी कौशलनं प्रमुख भूमिका साकारली आहे. त्याचा नवा लूक व्हायरल झाला आहे. त्याच्या त्या लूकचं सोशल मीडियावरुन प्रचंड कौतूक होत आहे.

विक्की कौशल अभिनीत सरदार उधम सिंह, अमेझॉन ओरिजिनल चित्रपट शूजीत सरकारद्वारे दिग्दर्शित आणि रोनी लाहिरी आणि शील कुमार यांच्याद्वारे निर्मित आहे. भयकंपित करणारी कहाणी या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येणार आहे. सरदार उधम या एका वीर व्यक्तिची संघर्षयात्रा आहे. ज्याने हे दाखवून दिले आहे की, जग आपल्या प्रेमळ देशवासियांच्या आयुष्याला कधीच विसरू शकत नाही. 1919 च्या जलियनवाला बाग नरसंहारात क्रूरपणे मारले गेले त्या घटनांवर आधारित हा चित्रपट आहे.

loading image
go to top