'लग्नाबाबतचं ते वृत्त...'; अभिनेत्री सोनाक्षीनं दिलं उत्तर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

'लग्नाबाबतचं ते वृत्त...'; अभिनेत्री सोनाक्षीनं दिलं उत्तर
'लग्नाबाबतचं ते वृत्त...'; अभिनेत्री सोनाक्षीनं दिलं उत्तर

'लग्नाबाबतचं ते वृत्त...'; अभिनेत्री सोनाक्षीनं दिलं उत्तर

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - त्या अभिनेत्रीचे वडिल हे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेते आहेत. ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यांच्या मुलीला बॉलीवूडमध्ये ब्रेक देण्याचे काम प्रख्यात अभिनेता सलमान खान यानं त्याच्या दबंग चित्रपटातून केले होते. त्या चित्रपटानं बॉलीवूडला उत्तम अभिनेत्री दिली असं चाहते म्हणू लागले. त्या अभिनेत्रीचं नाव सोनाक्षी सिन्हा. तिनं आपल्या अभिनयानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या अभिनयाचे समीक्षकांनी देखील कौतूक केले आहे. गेल्या काही चित्रपटांमधून तिनं निराशा केली असली तरी येत्या काळात ती मोठी गुड न्यूज देणार असल्याच्या चर्चेनं चाहत्यांची उत्सुकता वाढली होती.

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही प्रख्यात अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आहे. ती सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असणारी अभिनेत्री आहे. तिचा फॅन फॉलअर्सही मोठा आहे. ती नेहमीच तिच्या वैयक्तिक कारणास्तव चाहत्यांच्या चर्चेत राहिलेली अभिनेत्री आहे. गेल्या काही दिवसांपासून सोनाक्षीची वेगळी चर्चा समोर आली आहे. ती म्हणजे बॉलीवूडमधील प्रसिद्ध अशा खान कुटूंबियांची सून होणार असल्याची चर्चा रंगली होती. तिनं आतापर्यत वेगवेगळ्या चित्रपटांमधून चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. मात्र आता त्यावर सोनाक्षीच्या प्रसिद्धी प्रमुखांकडून आलेल्या माहितीनुसार, सोनाक्षीनं अद्याप त्या वृत्ताला कोणत्याही प्रकारचा दुजोरा दिलेला नाही. त्या माहितीला कोणत्याही प्रकारचा आधार नसल्याचे सांगण्यात आले आहे. त्यात तथ्य नाही. यामुळे गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर ज्या प्रकारची माहिती व्हायरल होत आहे त्याबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यास सोनाक्षीनं नकार दिला आहे.

सोनाक्षी आता लवकरच सलमान खानच्या परिवाराशी नातं जोडणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली होती. मात्र त्याबाबतच्या सर्व शक्यता सोनाक्षीच्या प्रसिद्धी टीमच्या वतीनं फेटाळून लावण्यात आल्या आहेत. सोनाक्षीविषयी एक गोष्ट फार कमी जणांना माहिती आहे की, ती लहान असतानाच एकाच्या प्रेमात पडली. मात्र त्यानं तिनं तिला धोका दिला. तिचा विश्वासघात केला. याविषयी तिनं एका वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत खुलासा केला आहे. जेव्हा ती शाळेत होती तेव्हा तिला प्रेम झालं होतं. यावेळी तिनं आपल्या प्रेमाविषयी जाहिरपणे सांगितले होते. मी त्या प्रसंगातून खूप काही शिकले. आपण वेळेनुसार बदलत जातो. आपल्याला तसे बदलावे देखील लागते. मी जेव्हा बॉलीवूडमध्ये काम सुरु केलं तेव्हा मला देखील वेगवेगळ्या प्रकारचे अनुभव आल्याचे तिनं यावेळी सांगितलं. मला नेहमी वाटतं की, तुम्हाला फक्त अशा व्यक्तिला शोधायचं आहे जो तुमच्यावर निस्सीम प्रेम करतो....

loading image
go to top