
Bigg Boss 15 Winner: तेजस्वी प्रकाश विजेती, प्रतिक सहेजपाल उपविजेता
लोकप्रिय असणारा शो म्हणून बिग बॉसकडे (Bigg Boss 15) पाहिले जाते. आज या रियॅलिटी शो ची सांगता झाली आहे. बिग बॉसच्या 15 व्या सीझनचे विजेतपद तेजस्वीने मिळवले आहे. तिच्या विजयाची शाश्वती त्याच्या चाहत्यांना होती. गेल्या काही दिवसांत तिनं आपल्या परफॉर्मन्सनं चाहत्यांना जिंकून घेतले होते. मात्र सरतेशेवटी तिला यश मिळाले आहे.
मनोरंजन विश्वात सर्वाधिक लोकप्रिय असणाऱ्या बिग बॉसच्या 15 व्या सीझनची आज सांगता झाली आहे. अतिशय चुरशीच्या लढतीमध्ये अनेक स्पर्धकांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतल्याचे दिसून आले आहे. त्यामध्ये शमिता शेट्टी, करण कुंद्रा, निशांत भट्ट यांच्या नावाचा आवर्जुन उल्लेख करावा लागेल.
शमिता पाठोपाठ आता तिचा सहकारी करण कुंद्रा हा देखील बिग बॉसमधून बाहेर पडला आहे. आता बिग बॉसच्या घरात तेजस्वी प्रकाश, प्रतीक सहजपाल हे दोघेच राहिले आहेत. आता त्यांच्यात चुरस आहे. थोड्याच वेळात यंदाच्या सीझनमधील विजेते समोर येणार आहेत.
Bigg Boss Grand finale: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोण (Bollywood actress deepuika padukone) ही आता बिग बॉसच्या घरात आली आहे. घरात चार स्पर्धक असून त्यापैकी तीन स्पर्धकांची ती निवड करणार आहे. वास्तविक दीपिका ही तिच्या गहराईयाच्या प्रमोशनसाठी आली आहे. त्यामुळे प्रमोशनसोबतच तिनं टॉप थ्री स्पर्धकांची निवड ती करणार आहे. आता थोड्यावेळापूर्वी निशांत भट्ट स्पर्धेतून बाहेर पडला आहे. त्यानं दहा लाख घेऊन बिग बॉसचे घर सोडले आहे.
Web Title: Bollywood Actress Deepika Padukone Now Bigg Boss House For Top Three Contestants
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..