'जावेद चाचा थँक्यु'; कंगणाचा टोमणा

सकाळ ऑनलाईन टीम
Wednesday, 3 March 2021

कंगणानं कोर्टात जाऊन जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे पुढील काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबई - अभिनेत्री कंगणा राणावत आणि प्रसिध्द गीतकार जावेद अख्तर यांच्यातील वाद टोकाला गेला आहे. कंगणाच्या विरोधात त्यांनी न्यायालयात तक्रार केली आहे. न्यायालयाने दोनवेळा समन्स बजावूनही कंगणा न्यायालयात उपस्थित न राहिल्यानं तिला न्यायालयानं समन्स बजावले आहे. तसेच पोलिसांना तिच्यावर गुन्हा दाखल करण्यास सांगितले आहे. त्यानंतर कंगणानं जावेद अख्तर यांना प्रत्युत्तर दिले आहे. तिनं त्यांचे आभार मानले असून त्याविषयी शेलक्या शब्दांत त्यांना सुनावले आहे.

कंगणानं कोर्टात जाऊन जामीनासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे पुढील काळात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जावेद अख्तर आणि कंगणा य़ांच्यातील वाद दिल्लीतील शेतकरी आंदोलनापासून सुरु झाला होता. कंगणानं त्यावेळी अनेक कलाकारांची नाराजी ओढावून घेतली होती. जावेद यांनी कंगणावर मानहानीचा दावा दाखल केला होता. कंगणानं व्टिट करुन सांगितले की, आणखी एक दिवस आणि आणखी एक एफआयआर, महाराष्ट्र सरकारची मदत करणा-या जावेद चाचा यांचे आभार मानायला हवे.

माझ्यासाठी वॉरंट जारी केलं. काय गुन्हा होता माझा तर शेतकरी आंदोलनाचे समर्थन केले होते. आणि माझ्यावर गुन्हा दाखल झाला होता.आताही शेतकरी आंदोलनाविषयी मी प्रतिक्रिया दिली होती. त्यामुळे माझ्यावर पुन्हा एकदा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र त्याचा माझ्यावर काहीही परिणाम होणार नाही. दुस-या व्टिटमध्ये तिनं सांगितले आहे की, महाराष्ट्र सरकार आणि मुंबई महानगरपालिका यांच्यावर मी प्रश्नचिन्ह उभे केले होते.

त्यावेळी कंगणानं लिहिलं होतं, माझ्यावर कितीही अन्याय करा, माझे घर तोडा, नाहीतर मला जेलमध्ये टाका मी कुणालाही घाबरत नाही आणि मला सुधारण्याचा प्रयत्न करणा-यांनो मी तर तुम्हालाच सुधारल्याशिवाय राहणार नाही. 
 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bollywood actress Kananga ranaut tweet on javed akhtar actress says javed chacha seeks government help in issuing warrant against me