esakal | कंगनाची पुन्हा 'टिव टिव'; म्हणाली,'श्रीदेवीनंतर मीच'
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut

अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते. मग ते सरकार विरोधी वक्तव्य असो वा बॅालिवूडमधील कलाकारांवरील टीका कंगना बिनधास्त तिची मते सोशल मीडियावर शेअर करते.

कंगनाची पुन्हा 'टिव टिव'; म्हणाली,'श्रीदेवीनंतर मीच'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत तिच्या बोल्ड वक्तव्यासाठी ओळखली जाते. गेल्या काही महिन्यांपासून सोशल मीडियावर सक्रीय असलेली कंगना तिच्या ट्विटमुळे अनेकदा चर्चेत राहिली आहे. अभिनेत्री कंगना रानौत नेहमीच सोशल मीडियावर काही ना काही पोस्ट करत असते. मग ते सरकार विरोधी वक्तव्य असो वा बॅालिवूडमधील कलाकारांवरील टीका कंगना बिनधास्त तिची मते सोशल मीडियावर शेअर करते. ट्विटरच्या माध्यमातून कंगना आपली मते लोकांपर्यंत पोहचवते. अनेक वेळा ट्विटमुळे तिला ट्रोल करण्यात आलं आहे. सोशल मीडियावरील वक्तव्यांमुळे कंगना वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

नुकतेच कंगनाने असंच एक वादग्रस्त वक्तव्य ट्विटरवर केले आहे. कंगनाच्या तन्नु वेड्स मन्नु या चित्रपटाला 10 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्या निमित्ताने कंगनाच्या एका चाहत्याने  ट्विट करून कंगनाला आणि या चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या. ट्विटमध्ये कंगनाचा तन्नु वेड्स मन्नु चित्रपटातील भूमिकेचा फोटो दिसत आहे. हे ट्विट रिट्विट करून कंगना म्हणाली की, 'सुरवातीच्या काळात मी ठोकळेबाज भूमिकांमध्ये अडकून पडले होते. पण तन्नु वेड्स मन्नु या चित्रपटाने माझ्या सिनेसृष्टीतील कारकिर्दीला नवी दिशा दिली. मोठ्या पडद्यावर माझी विनोदी अभिनेत्री म्हणून यामुळे एण्ट्री झाली. तन्नु वेड्स मन्नु चित्रपटापासून सुरू झालेला विनोदी भूमिकांचा प्रवास क्वीनमुळे अधिकच बहरला. गेली 10 वर्षे मी विनोदी भूमिका साकारत आहे. श्रीदेवीनंतर विनोदी भूमिका सातत्याने साकारणारी मी बॉलीवूड मधली केवळ दुसरी अभिनेत्री आहे!' असं रिट्विट करून #10yearsoftanuwedsmanu हा हॅशटॅग कंगनाने वापरला. कॅप्शनमधून कंगनाने स्वत:ची तुलना बॅालिवूडमधील दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीसोबत केली त्यामुळे तिला ट्विटरवर ट्रोल केलं जातयं. 

हे वाचा - 'माझ्या नवऱ्याची बायको'मधील अभिनेत्याला झाली मुलगी; आगळ्यावेगळ्या बारशाची सोशल मीडियावर चर्चा

तन्नु वेड्स मन्नु चित्रपटाबाबत कंगनाने आणखी एक ट्विट केले आहे. ट्विटमध्ये कंगना म्हणाली,' तन्नु वेड्स मन्नु चित्रपटासाठी आनंद एल राय आणि लेखक हिमांशू शर्मा यांचे आभार. जेव्हा ते बॉलिवूडमध्ये स्ट्रगल करत होते तेव्हा ते निर्माते म्हणून माझ्याकडे आले. मला तेव्हा वाटले की, मी त्यांच्यासोबत काम केले तर त्यांनाही फायदा होऊ शकतो. पण याउलट त्यांच्यामुळे माझेच करिअर बहरले. कोणीच सांगू शकत नाही की कोणत्या चित्रपटाला लोकप्रियता मिळेल आणि कोणत्या चित्रपटाला नाही. सगळं काही नशीबामुळे असतं. माझ्या नशीबात तुम्ही होतात याचा मला आनंद आहे.' 

लवरकच कंगनाचे धाकड आणि थलाइवी हे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. थलाइवी हा चित्रपट तामिळनाडूच्या दिवंगत माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या आयुष्यावर आधारित आहे. चित्रपट जयललितांची कंगना करणार असून त्याचा फर्स्ट लूकही रिलीज झाला आहे. थलाइवी चित्रपटातील कंगनाच्या लूकमुळे प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. तसेच कंगनाचा 'धाकड' हा चित्रपट 1 ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात कंगना गुप्तहेराच्या भूमिकेत दिसणार आहे.

loading image