esakal | सैफ- तैमुरची शेती, फोटो पाहिलेत?

बोलून बातमी शोधा

 bollywood actress kareena kapoor instagram post shows saif ali khan and taimur ali khan
सैफ- तैमुरची शेती, फोटो पाहिलेत?
sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडमध्ये अतिशय लोकप्रिय जोडी सैफ अली खान आणि करिना कपूरची कायमच चर्चा असते. त्यांच्या प्रत्येक गोष्टीची चर्चा ही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात होताना दिसते. तैमुरमुळे तर ते कायम चर्चेत असतात. यावेळी सैफ अली खानची लोकप्रियता आणखी वाढणार आहे. याचे कारण म्हणजे तो आणि तैमुर चक्क शेती करत असल्याचा एक फोटो व्हायरल झाला आहे. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याला थोड्या वेळात शेकडो लाईक्स आणि कमेंटस आल्या आहेत. 22 एप्रिलचा दिवस हा जगभरात वसुंधरा दिन म्हणून साजरा करण्यात येतो. यादिवशी अनेक सेलिब्रेटींनी आपले फोटो शेअर करुन चाहत्यांना या दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यात अभिनेत्री करिना कपूरचाही समावेश आहे.

करिना कपूरनं तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवरुन दोन फोटो शेअर केले आहेत. त्यात एका फोटोमध्ये सैफ अली खान तर दुस-या फोटोमध्ये तैमूर शेतात काम करताना दिसत आहे. तैमुरच्या हातात खुरपे असून तो शेतात काम करत आहे. दुसरीकडे सैफ अली खान हातात फावडे घेऊन उभा आहे. याशिवाय करिनानं आणखी एक फोटो शेअर केला आहे त्यात तैमुर झाडाखाली बसला आहे. त्यांच्या या फोटोंना चाहत्यांची मोठ्या प्रमाणात प्रसिध्दी मिळाली आहे. करिनानं त्या फोटोला कॅप्शनही दिली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, आणखी झाडे लावा. वसुंधरा दिनाच्या दिवशी त्यांनी अशाप्रकारचे फोटो शेअर केले होते.

या दिनाच्या निमित्तानं झाडे वाचविण्याचा संदेश करिनानं तिच्या चाहत्यांना दिला आहे. करिनाच्या या पोस्टला चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. अनेकांनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. तर काहींनी तिला ट्रोलही केले आहे. सोशल मीडियावरील युझर्सनं त्या दोघांचे कौतूक केलं आहे. एका तासाच्या आत त्या फोटोला एक लाखापेक्षा जास्त लाईक्स आले होते. आता ती संख्या वाढली आहे.

करिना सोशल मी़डियावर अॅक्टिव्ह असणारी सेलिब्रेटी आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला होता. त्यात असं दिसून आलं होतं की करिनानं पाच किलोमीटरपेक्षा जास्त वॉकिंग केले होते. त्या पोस्टला कॅप्शन देताना तिनं लिहिलं होतं की, लॉकडाऊनचा असा अर्थ नाही की तुम्ही हार मानायची. करिनाच्या त्या पोस्टला चाहत्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.