Viral Video: मलायकाचा 'KISS', कागदावरील मासा झाला जिवंत|Bollywood Actress Malaika Arora Indias Got Talent | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malaika Arora

Viral Video: मलायकाचा 'KISS', कागदावरील मासा झाला जिवंत

टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये काही मालिकांची लोकप्रियता ही नेहमीच चर्चेचा विषय असते. इंडियाज गॉट टँलेटची(India's Got Talent) लोकप्रियता नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेते. त्या (Entertainment News) मालिकेमध्ये परीक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या मलायका अरोराचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटस दिल्या आहेत. त्यात सहभागी झालेल्या एका स्पर्धकानं (Abhishek Acharya Fish Magic)आपल्या हातचलाखीनं सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. किरण खेर (Kirron Kher) , करण जोहर (Karan Johar) यांनी देखील त्या स्पर्धकाचे कौतूक केले आहे. मलायकाला (Malaika Arora) त्या जादुगारानं तिच्या किसचा परिणाम त्या व्हिडिओतून दाखवून दिला आहे.

सोनीनं हा व्हिडिओ शेयर केला आहे. आपल्या जुन्या व्हिडिओमधून त्य़ांनी हा व्हिडिओ नव्यानं सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. आता पुन्हा त्या व्हिडिओची चर्चा आहे. 50 सेकंदामध्ये आपली हातचलाखी दाखवणाऱ्या दिल्लीच्या अभिषेक आचार्यानं यावेळी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तो सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. त्यानं केलेली हातचलाखी मात्र सर्वांच्या कौतूकाचा विषय ठरली आहे. तो एक कागद घेऊन मलायका जवळ जातो. त्या कागदावर त्यानं माशाचे चित्र काढले आहे. यावेळी तो मलायकाला त्या माशाला किस करायला सांगतो. मलायकानं तसं केल्यावर अभिषेक तो कागद एका पाण्यानं भरलेल्या ग्लासात ठेवून देतो.

हेही वाचा: Viral: शबाना आझमींच्या भाचीसोबत कॅब चालकानं...

काही वेळानं त्या ग्लासातील मासा जिवंत झालेला असतो. तो पाण्यात पोहायला लागतो. ही जादू पाहून किरण खेर आणि करण जोहर थक्कच होवून जातात. मलायकाला तर आपण काय पाहतो आहोत यावर विश्वासच बसत नाही. तिनं तो पाण्याचा ग्लास पुन्हा उचलून खात्री करुन घेतली की खरचं तो मासा जिवंत आहे की नाही. त्यानंतर तिनं अभिषेकचं कौतूक केलं आहे. त्या व्हिडिओला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यावर त्यांनी वेगवेगळ्या कमेंटसही दिल्या आहेत.

हेही वाचा: Jhund Movie: नागराजचा झुंड 'मास्टरपीस' कौतूक करताना धनुषला...

Web Title: Bollywood Actress Malaika Arora Indias Got Talent Kiss Fish Magic Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..