esakal | NCB ला टीप देणाऱ्याची माहिती केली उघड; पूजा भट्ट गोत्यात
sakal

बोलून बातमी शोधा

NCB ला टीप देणाऱ्याची माहिती केली उघड; पूजा भट्ट गोत्यात

NCB ला टीप देणाऱ्याची माहिती केली उघड; पूजा भट्ट गोत्यात

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूड (bollywood actress) अभिनेत्री आणि दिग्दर्शक पूजा भट्ट (pooja bhatt) ही तिच्या हटकेपणासाठी प्रसिद्ध आहे. आपल्या वेगळेपणासाठी आणि परखडपणासाठी देखील ती ओळखली जाते. अलीकडच्या काळात तिची बॉम्बे बेगम्स (bombay begums) नावाची मालिका प्रसिद्ध झाली होती. त्यात तिनं केलेल्या भूमिकेचे कौतूक झाल्याचे दिसून आले. आता अभिनेत्री एका वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे. त्याचे कारण सध्याचे बॉलीवूडचा किंग खान शाहरुखच्या मुलाची आर्यन खानची बाजू घेतल्याबद्दल. तिनं आर्यन खानला पाठींबा दिला. तो देताना ज्या व्यक्तीनं एनसीबीला त्या प्रकरणाची माहिती दिली होती त्याचा जीवही तिनं धोक्यात घातल्याचा आरोप पूजा भट्टवर करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

सोशल मीडियावर पूजा ही नेहमी चर्चेत असणारी अभिनेत्री आहे. आपल्या परखड मतांबद्दलही ती ओळखली जाते. आर्यन खानच्या प्रकरणात पूजा चर्चेत आली आहे. तिनं किंग खानला पाठींबा देत आपण त्याच्या पाठीशी असल्याचे सांगितले. तिनचं नव्हे तर अनेक अभिनेत्यांनी किंग खानला पाठींबा दिला होता. त्यामध्ये सलमान खान, दिग्दर्शक हंसल मेहता, सुनील शेट्टी, यांचा समावेश आहे. पूजानं ज्या व्यक्तीनं एनसीबीला त्या क्रुझवर सुरु असणाऱ्या पार्टीची माहिती देणाऱ्या व्यक्तीचा जीव धोक्यात घातल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे तिच्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. आर्यनला ज्यावेळी अटक झाली तेव्हा त्याच्यासमवेत एका व्यक्तीनं सेल्फीचा फोटो व्हायरल केला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेला उधाण आले होते.

सुरुवातीला अनेकांना वाटले होते की, ती व्यक्ती एनसीबीची आहे. मात्र त्यावर एनसीबीनं खुलासा केला की, त्या व्यक्तीचा आणि एनसीबीचा काही एक संबंध नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनसीबीला त्या क्रुझवरील पार्टीची माहिती त्या व्यक्तीनं दिली होती. त्यासंबंधी पूजानं एक व्टिट केलं होतं. त्यात तिनं त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा उल्लेख केला होता. पूजाच्या त्या व्टिटवरुन माध्यमांच्या प्रतिनिधींनी तिला विचारणा केली होती. आणि त्या व्यक्तीचा जीव धोक्यात घातल्याचे सांगितले. एका पत्रकारानं सांगितलं की, तो व्यक्ती कोणत्याही क्षेत्राशी संबंधित असू शकतो, तो पोलीस, ईडी, सीबीआय, एनसीबी यापैकी कोणत्याही विभागाशी संबंधित असू शकतो. एखाद्या गुन्ह्याची माहिती देणं हा काही गुन्हा नाही. मात्र त्या गुन्ह्याशी संबंधित व्यक्तीचा जीव धोक्यात घालणे चूकीचे आहे. जेव्हा त्याच्याविषयीची माहिती व्हायरल केली जाते. असे त्या पत्रकारानं म्हटले होते.

हेही वाचा: Drugs Case: आर्यन खान चार वर्षांपासून घेत होता ड्रग्ज

हेही वाचा: आर्यन खानला मिळणार जामीन?

loading image
go to top