esakal | 'कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडं काहीच नाही'

बोलून बातमी शोधा

bollywood actress richa chadha attacks modi government

'कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी आपल्याकडं काहीच नाही'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

मुंबई - कोरोनानं मृत्यु होणा-यांची संख्या मोठी आहे. तो आकडा तीन अंकी झाला आहे. यासगळ्या परिस्थितीला कशाप्रकारे सामोरं जावं असा प्रश्न शासनाला पडला आहे. प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. देशाचे पंतप्रधान यांनी लॉकडाऊनला पर्याय नसल्याचे म्हटले आहे. दुसरीकडे राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे राज्यात पुन्हा कडक लॉकडाऊनची घोषणा करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. अशावेळी नागरिकांनी काळजी घ्यावी, घरातच थांबून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन काही बॉलीवूड सेलिब्रेटींनी केले आहे. तसेच सध्याच्या परिस्थितीत कशाप्रकारे प्रशासन हतबल झाले आहे याकडे अभिनेत्री रिचा चढ्ढा सारख्या अभिनेत्रींनी लक्ष वेधले आहे.

देशात कोरोनाचा वाढता कहर पाहता रिचानं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिनं लिहिलं आहे की, आपल्याकडे कोरोनाची एवढी भयाण परिस्थिती असताना देखील आपण अद्याप प्रभावी उपाययोजना केलेल्या नाहीत. एकीकडे कोरोनावरील व्हॅक्सिनचा, रेमडेसिव्हर इंजेक्शनचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना ऑक्सिजन बेड शिल्लक नाहीत. देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात सापडले आहेत. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी वाढताना दिसत आहे. अद्याप काही राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे.

बुधवारचा दिवस कोरोनाच्या आकडेवारीचा विक्रमी दिवस होता. यादिवशी सर्वच रेकॉर्ड तुटल्याचे दिसून आले. भारतात त्यादिवशी कोरोना बाधितांची संख्या ही तीन लाखांच्या पुढे गेली आहे. यासगळ्यावर रिचानं आपल्या परखड शैलीत भाष्य केले आहे. रिचानं लिहिलं आहे की, तुम्ही काहीही सांगाल, जसे की आपल्याकडे 20 स्मार्ट शहरं आहेत. आम्ही सुपर पॉवर आहोत. आमची अर्थव्यवस्थेनं पाच ट्रिलियनचा आकडा पार केला आहे. आणि सगळ्यांना नोकरीही देणार आहोत. तुम्ही काहीही सांगाल जे तुम्हाला योग्य वाटेल. प्रत्यक्षात हे खरं नाही.

खरं हे आहे की, आपल्याकडं कोरोनाचा सामना करण्यासाठी काहीही नाहीये. आपल्याकडे ऑक्सिजन सिलिंडर नाहीत, औषधं नाहीत, पुरेशा प्रमाणात बेड्स नाहीत. एवढचं काय तर स्मशानात मृतांना जाळण्यासाठी लाकडंही नाहीत. या शब्दांत रिचानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. तिच्या त्या व्टिटला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आहे.