बॉलिवूड सोडलेल्या अभिनेत्रीने गुपचूप उरकलं लग्न; पाहा VIDEO

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

मानवतेची सेवा करण्यासाठी आपण बॉलिवूड सोडत असल्याचं तिने म्हटलं होतं. आता तिने लग्न केल्याची माहिती समोर येत आहे.

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री झायरा वसिम हिच्यानंतर बिग बॉस 6 ची कंटेस्टंट आणि अभिनेत्री सना खानने अभिनय सोडल्याचं जाहीर केलं होतं. मानवतेची सेवा करण्यासाठी आपण बॉलिवूड सोडत असल्याचं तिने म्हटलं होतं. आता तिने लग्न केल्याची माहिती समोर येत आहे. सना खानने मुप्ती अनस याच्यासोबत सूरतमध्ये शनिवारी लग्न केल्याचं समोर आलं आहे.

याआधी सना खानने इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली होती. सनाच्या पोस्टवर युजर्सनी तिला मेकअपवरून ट्रोल केलं होतं. त्यावेळी ट्रोलर्सना तिने सडेतोड उत्तरही दिलं होतं. बॉलिवूड सोडण्याआधी तिने एक मेसेज दिला होता. त्यामध्ये आपण मानवतेची सेवा करण्यासाठी बॉलिवूड सोडत आहे असं म्हटलं होतं. सना खानने ही पोस्ट शेअर करताना आपल्या जीवनातील हा महत्त्वाचा निर्णय असल्याचं म्हटलं होतं. तसंच याचा आपल्याला आनंद असल्याचंही सांगितलं होतं.

तिने पोस्टमध्ये म्हटलं होतं की, माझा सर्वात आनंदाचा हा क्षण आहे. अल्लाह माझ्या या प्रवासात माझी मदत करो आणि रस्ता दाखवू दे. आता मी माझ्या जीवनातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या वळणावर आहे. गेल्या काही वर्षांपासून फिल्म इंडस्ट्रीमध्ये राहिले. यामध्ये मला पैसा, प्रसिद्धी सर्व काही मिळालं. हे सर्व मला तुमच्या सारख्यांमुळे मिळालं यासाठी मी तुमची आभारी आहे असंही तिने म्हटलं होतं. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bollywood actress sana khan married with mufti video viral