आई म्हणून कशी आहे, लोकांनी सांगण्याची गरज नाही: सनीचा लिओनीचा संताप

अभिनेत्री सनी लियोनी (Sunny Leoni) ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.
Sunny Leoni
Sunny Leoniesakal

Entertainment News: अभिनेत्री सनी लिओनी (Sunny Leoni) ही तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे. तिचा सोशल मीडियावर (Social Media News) चाहतावर्गही मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून सनीला ट्रोल केले जात असल्याचे तिचे म्हणणे आहे. सनीनं काही मुलांचे पालकत्व घेतले आहे. त्यावरुन तिला नेटकऱ्यांच्या ट्रोलिंगचा सामना करावा लागत आहे. आपण (Bollywood Actress) पूर्वआयुष्यात काय केले यावरुन नेहमी लोकं नाव ठेवतात. तो माझ्या कामाचा भाग होता. आता आपण ते काम सोडून दिले असून जेव्हा नव्यानं आयुष्य सुरु करतो तेव्हाही काहीजणं जाणीवपूर्वक भुतकाळातील आठवणीत रमतात. हे पाहून वाईट वाटत असल्याची भावना सनीनं यावेळी व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर सनीनं तिच्या कुटूंबासमवेतचा एक फोटो शेयर केला होता. (Sunny Leoni Family) त्यावरुन तिला आता ट्रोल केले जात आहे. सनीनं सांगितलं आहे की, मी एक चांगली आई आहे आणि ते मला कुणाला समजावून सांगण्याची गरज नाही. दरवेळी मी माझ्या कुटूंबासमवेत जे फोटो शेयर करते त्याला नावं ठेवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला जातो. जेणे कुणी नावं ठेवत असतील त्यांना मला सांगायचे आहे की, आपण जे करता आहात ते चुकीचे आहे. नेटकरी तिच्या निशा नावाच्या मुलीला सातत्यानं ट्रोल करताना दिसतात. त्यावरुन सनी चिडली आहे. निशाला सनीनं दत्तक घेतलं आहे. नेटकऱ्यांनी सनी आणि तिचा पती डॅनियल वेबरचा फोटो सोशल मी़डियावर पोस्ट केला होता.

Sunny Leoni
Viral Video : तोंडाल रंग लावला म्हणून पिचकारीत भरलं नाल्याचं पाणी अन्...

त्या फोटोवरुन सनी म्हणते, सोशल मीडियावर माझ्याविषयी काय लिहिले जाते याचा मला काहीही फरक पडत नाही. मात्र दरवेळी माझ्या कुटूंबाविषयी बोलले जाते त्याचा त्रास होतो. आम्ही आमच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल लाईफविषयी गंभीरपणे विचार करतो. त्यामुळे नेटकऱ्यांनी उगाचच ट्रोल करण्याचा प्रयत्न करु नये. असे आवाहनही केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com