दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला, म्हणते, 'मला माझ्या पप्पांनी'... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला, म्हणते, 'मला माझ्या पप्पांनी'....
दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला, म्हणते, 'मला माझ्या पप्पांनी'....

दारुचा ग्लास डोक्यावर ठेवला, म्हणते, 'मला माझ्या पप्पांनी'....

sakal_logo
By
टीम इ सकाळ

मुंबई - बॉलीवूडमध्ये ज्या अभिनेत्री त्यांच्या अभिनयामुळे नव्हे तर त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे जास्त अॅक्टिव्ह आहेत असं म्हटलं जातं, त्यात अभिनेत्री स्वराचा नंबर वरचा आहे. तिच्याबरोबर अभिनेत्री कंगनाही असतेच. त्या दोघींमध्ये असलेला छत्तीसचा आकडा हा त्यांच्या चाहत्यांसाठी काही नवीन नाही. दरवेळी सोशल मीडियावर एखादी पोस्ट शेयर करायची. त्यावरुन चाहत्य़ांच्या चर्चेत राहाय़चे हे त्या दोघींनाही साधले आहे. गेल्या आठवडयापासून अभिनेत्री कंगना रनौत ही तिच्या बेताल वक्तव्यामुळे चर्चेत आली आहे. दुसरीकडे स्वरानंही तिची जागा भरुन काढली आहे. सध्या सोशल मीडियावर तिचा एक फोटो चाहत्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यामुळे तिला ट्रोलही व्हावे लागले आहे.

दोन दिवसांपूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायदा मागे घेत असल्याचे सांगितले. त्यावरुन देशभरातील शेतकरी बांधवांनी आनंद व्यक्त केला. त्यामध्ये बॉलीवूडमधील काही सेलिब्रेटींचा देखील समावेश होता. स्वरा भास्कर ही देखील त्यात आघाडीवर होती. तिनंही व्टिट करुन तो आनंदोत्सव साजरा केल्याचे सोशल मीडियावर सांगितले होते. आता तिनं एक गंमतीशीर व्हिडिओ शेयर केला आहे. त्यामध्ये तिनं आपल्या डोक्यावर दारुचा ग्लास ठेवला आहे. आणि ती एका गाण्यावर नृत्य करताना दिसत आहे. हा आनंद कृषी विषयक कायदा मागे घेतल्याचा आहे.

स्वरानचं या व्हिडिओविषयी सांगितलं आहे. त्यामुळे तिला मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आले आहे. काहींनी तिला वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंटही दिल्या आहेत. त्या व्हिडिओविषयी तिनं लिहिलं आहे की, पार्टी ट्रीक- हे मला माझ्या वडिलांनी शिकवलं आहे. यापुढे ती म्हणते, 19 नोव्हेंबरला पीएम मोदी यांनी कृषी कायदा मागे घेतला त्याचे हे सेलिब्रेशन आहे. त्यामुळे हा आनंदोत्सव आम्ही साजरा करत आहोत. कृषी कायद्याला देशभरातून मोठ्या प्रमाणात विरोध झाला होता. त्या कायद्याच्या विरोधात दिल्लीमध्ये बराच काळ शेतकऱ्यांनी आंदोलन छेडले होते. त्यात देशभरातील शेतकरी सहभागी झाले होते.

loading image
go to top