esakal | 'मी त्यांच्यासारखे कपडे घातले की मूर्ख दिसते'; विद्याने सांगितला अनुभव
sakal

बोलून बातमी शोधा

 vidya balan

'मी त्यांच्यासारखे कपडे घातले की मूर्ख दिसते'; विद्याने सांगितला अनुभव

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूडमधील अनेक अभिनेत्री त्यांच्या फॅशनकडे विशेष लक्ष देतात. वेगवेगळ्या ड्रेस आणि लूकमध्ये या अभिनेत्री प्रेक्षकांच्या भेटीस येत असतात. बॉलिवूडमधील अभिनेत्री विद्या बालनने (vidya balan) इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या साड्यांचा नवा फॅशनचा ड्रेंड सुरू केला. विद्या प्रत्येक कार्यक्रमात आणि पुरस्कार सोहळ्यात ट्रेडिशनल लूकमध्येच हजेरी लावते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये विद्याला तिच्या या फॅशन सेन्सबद्दल विचारण्यात आले. तेव्हा तिने दिलेल्या उत्तराने सर्वांचे लक्ष वेधले. (bollywood actress vidya balan says she looked foolish when she dressing up like other actresses)

आर जे सिद्धार्थ कन्ननने विद्याला मुलाखतीमध्ये विचारले की, 'तु कधी साडीवरील पारंपरिक लूकऐवजी इतर अभिनेत्रींसारखा ग्लॅमरस लूक ट्राय केला आहे का?' या प्रश्नावर विद्याने उत्तर दिले, 'मी अनेकदा इतर अभिनेत्रींसारखे कपडे घालण्याचा प्रयत्न केला पण त्या कपड्यांमध्ये मी मूर्खासारखी दिसत होते. त्या कपड्यांमध्ये मी कम्फर्टेबल नव्हते. इतर अभिनेत्री अशा प्रकारचे ड्रेस खूप चांगल्या पद्धतीने कॅरी करतात. पण मला ते जमत नाही. मला साडीच नेसायला आवडते. मी एकेदिवशी असे ठरवले होते की मला जे कपडे घालायला आवडतात तेच मी घालेन, मला जे करायला आवडेल तेच मी करेल आणि मला जे बोलायचे आहे तेच मी बोलणार. मला हे सर्व करायचे स्वातंत्र आहे. असं केलं तर लोकांकडे तुमचे कौतुक करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.'

हेही वाचा: निर्मिती ते वनिता; 'Size Zero' ट्रेंड मोडणाऱ्या अभिनेत्री

विद्याचा 'शेरनी' हा चित्रपट काही दिवसांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. तिच्या या चित्रपटामधील अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळली होती. लवकरच विद्या तिच्या तुम्हारी सुलू या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरेश त्रिवेणी यांच्या नव्या चित्रपटात काम करणार आहे.

हेही वाचा: 'मोहब्बतें' फेम अभिनेत्याचं करिअर फ्लॉप पण लाइफस्टाइल आलिशान

loading image
go to top